छत्रपती संभाजीनगर
Trending

महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! १९ अधिकारी व १२५ कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमित करण्यास मंजुरी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश २०२१ नियमानुसार विविध संवर्गातील तदर्थ पदोन्नती दिलेल्या कार्यरत पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती आज, ६ जुलै रोजी प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी नियमित करण्यास मंजुरी दिली.

या नियमित केलेल्या पदोन्नती मध्ये अधिकारी संवर्गातील १९ पदांचा समावेश आहे.
यात कार्यकारी अभियंता (स्थापत्य) -०२
मुख्य उद्यान अधिकारी- ०१
उप अभियंता (स्थापत्य)-१०
उप अभियंता (यांत्रिकी) – ०३
उप अभियंता (विद्युत) -०१
सहायक आयुक्त- ०२
अशा एकूण १९ पदांचा यात समावेश आहे.

तसेच १२५ कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पदोन्नती नियमित करण्यात आली आहे.
यात पशुधन विकास अधिकारी – ०२
उप अग्निशमन केंद्र अधिकारी – ०४
सिस्टर इन चार्ज – ०८
विस्तार अधिकारी (शिक्षण) -०२
सांख्यिकी अधिकारी -०१
अधीक्षक – ४१
वरिष्ठ लिपिक ६७
या पदांचा समावेश आहे.

Back to top button
error: Content is protected !!