छत्रपती संभाजीनगर
Trending

बेरोजगार युवकांना नोकरीची मोठी संधी ! पुणे, छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित ४० कंपन्या घेणार मुलाखती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुढाकार !!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शुक्रवार, ७ जुलै रोजी 'जॉब फेअर'

Story Highlights
  • -राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी तथा सूचना प्रौद्योगिकी संस्थान'च्या सहकार्याने आयोजन
  • ४० कंपन्यांचा सहभाग

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान व मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेगा जॉब फेअर’चे आयोजन शुक्रवारी (दि. सात) करण्यात आले आहे.

विद्यापीठातील नाटयगृहात (ऑडिटोरिअम) येथे सदर आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील नामांकित कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभागी झाल्या असून विविध पदविका, पदवी तसेच पद्व्योत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता या जॉब फेअरमध्ये नौकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथील ग्लॅन्ड केमिकल्स, ऋचा इंजिनिअर्स, यशश्री प्रेस, देवगिरी नागरी सहकारी बँक, शोध ऍडवांटेक एल एल पी., सोम ऑटो टेक, धूत ट्रान्समिशन, धूत मोटर्स, मॅनयुनायटेड, ऍक्सिस बँक, नॅशनल स्टोक एक्स्चेंज मुंबई, दिमार्क, पेटीएम, ऍक्सिस सेक्युरिटीस, असाही इंडिया ग्लास लिमिटेड, फिटवेल मोबिलिटी पुणे, तसेच इतरही काही आशा चाळीस कंपन्या सहभागी होणार आहेत.

७ जुलै रोजी सकाळी ठीक ९ वाजेपासून नावनोंदणी सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेतल्या जातील. या संदर्भातली कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या वेब साईट वरील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल च्या लिंक देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी ठीक ९ वाजेपासून विद्यापीठातील मुख्य सभागृहात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे, नायलेट चे श्री. के. लक्ष्मण व मॅनयुनायटेड कोर्पोरेटचे रवींद्र कंगराळकर यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!