फुलंब्री
Trending

आजकाल खेड्यापाड्यातही तलवारी मिळताहेत, पालगाव जधववाडीत फुलंब्री पोलिसांचा छापा ! धारदार तलवार जप्त करून आरोपीस केले जेरबंद !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- फुलंब्री पोलिसांनी जाधववाडी पाल येथ छापा टाकून धारदार तलवार जप्त करून आरोपीस जेलबंद केले. गोपनीय खबर्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फुलंब्री पोलिसांनी ही कारवाई केली. विक्रीसाठी त्याने तलवार बाळगली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आजकाल खेड्यापाड्यातही तलवारी मिळत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे.

दि. 06/07/2023 रोजी सकाळी 11.28 वाजता पोउपनि श्रीनिवास धुळे सोबत चालक पोहेकॉ तेलगोटे हे पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, विक्रम संजय धनावत (रा. जाधववाडी पाल) हा तलवार विक्री करण्यासाठी अथवा गंभीर गुन्हा करण्याच्या हेतूने त्याच्या राहते घरी तलवार बाळगून आहे.

ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या निर्देशानुसार पोउपनि धुळे, सोबत पोलीस स्टाफ पोहेकॉ तेलगोटे पोहेकॉ मुजिब सय्यद यांनी पालगाव जाधववाडी येथील विक्रम धनावत याच्या घरी 12.20 वाजता छापा मारला. त्याच्या घरी धारधार तलवार मिळून आली. त्यावरून सदर आरोपी विक्रम संजय धनावत यास अटक करण्यात आली. त्याच्यावर बेकायदेशीररित्या हत्यार प्रकरणी पोहेकॉ सैय्यद यांनी कायदेशीर फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक मुंजाळ करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जयदत्त भवर, पोनि रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीनिवास धुळे, पोहेका मुजीब सय्यद, पोहेको तेलगाट यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!