छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरात पाच अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांची भर ! रॅली, सण उत्सवासह आपत्तीत गर्दीवर राहणार करडी नजर !!

स्मार्ट सिटीकडून पोलिस आयुक्ताना ड्रोनचे प्रात्यक्षिक

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४-: स्मार्ट सिटी अंतर्गत घेतलेल्या सर्व्हेलेन्स ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक पोलिस आयुक्तालय स्थित कमांड व कंट्रोल सेंटर येथे शनिवारी झाले. यावेळेस पोलिस आयुक्त मनोज लोहिया उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनला 8 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. स्मार्ट सिटी तर्फे तत्कालीन सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या कार्यकाळात आयस्कोप प्रकल्प अंतर्गत 5 ड्रोन कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली होती. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांनी मागील अठवड्यात पोलीस आयुक्तालय स्थित कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन निर्देश दिले होते.

त्यानुसार आज सेस्कॉप प्रकल्पांतर्गत घेतलेल्या ड्रोन कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना देण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक (आय टी) फैज अली यांनी सांगितले की स्मार्ट सिटीने 5 ड्रोन घेतले आहेत आणि त्यातून 3 ड्रोन शहर पोलीस विभागासाठी आणि उर्वरित 2 ड्रोन मनपासाठी आहेत.

हे ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण स्मार्ट सिटी कडून पोलीस विभागाला आधी देण्यात आले होते. या ड्रोनचा वापर रॅली, सणासुदीत किंवा आपत्तीत गर्दी व्यवस्थापन, माहिती पोंचवण्यासाठी आणि कायदा आणि सु्यवस्था ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. यावेळेस पोलीस आयुक्तांनी कमांड अँड कंट्रोल सेंटर मधून ड्रोनचे संचालन कसे होऊ शकते यावर कार्य करण्याची सूचना दिली. यावेळी सायबर क्राईमच्या पोलीस निरीक्षक प्रविना यादव उपस्थित होत्या.

Back to top button
error: Content is protected !!