मुकुंडवाडीतील भाजी मंडई हटवली ! चिश्तिया चौक, बळीराम पाटील चौक, बजरंग चौक, मौलाना आझाद चौक, सेंट्रल नाका परिसरातही कारवाईचा बडगा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.१९ –छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सातत्याने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. आज वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी मुकुंडवाडीतील भाजी मंडई हटविण्यात आली.
याठिकाणी ५ टपऱ्या व २ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. याठिकाणी अतिक्रमण धारकांनी कारवाईस विरोध केला होता परंतु अतिक्रमण पथकाने विरोधास न जुमानता भाजी मंडई हटविण्याची कारवाई केली. तसेच मुकुंडवाडी चौकातील २ रसवंतीचे अतिक्रमण काढण्यात आले.
तसेच सिडको परिसरातील चिश्तिया चौक ते बळीराम पाटील चौक रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आले. बजरंग चौक ते मौलाना आझाद चौक, मौलाना आझाद चौक ते सेंट्रल नाका या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येऊन २ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच चिश्तिया चौक ते एमजीएम हॉस्पिटल या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. या ठिकाणी काही कांउंटर, शेगड्या व किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सागर श्रेष्ठ, पंडित गवळी, एसआय निर्मला ठाकरे, अशोक कदम व अतिक्रमण पथकाचे कर्मचारी यांनी सदर कारवाई केल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe