छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

हर्सूल टी पॉईंटवरून जाणाऱ्या मुख्य पंपिंग जलवाहिनीरील अनधिकृत नळ कनेक्शन मनपाने तोडले, गुन्हा दाखल होणार !

संभाजीनगर लाईव्ह, दि.२७ – हूर्सूल टी पॉईंट येथून जाणाऱ्या मुख्य पंपिंग जलवाहिनीरील अनाधिकृत नळ जोडणी मनपाच्या पथकाने तोडली. रस्त्यावर नाली करून ही नळ जोडणी घेतली होती. मात्र, मनपाच्या पथकाने ही चोरी उघडकीस आणली.

प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष वाहुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा पथक प्रमुख यांच्या अधिपत्त्याखाली हर्सूल टी पॉईंट येथून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या २५० मिमी मुख्य पंपिंग जलवाहिनीवरील एक नळ जोडणी खंडित करण्यात आली.

सदरील नळ जोडणी ही रस्ता आणि दुभाजक फोडून रोडच्या विरुद्ध दिशेस असणाऱ्या अकाल पुरख टॉवर्समध्ये जात असल्याचे स्पष्ट झाले. पुढील कार्यवाही साठी पंचनामा करून गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. ही कार्यवाही उप अभियंता के. एम. फालक, पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता गणेश मानकपे आणि इतर कर्मचारी मो. शरीफ, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, सागर डिघोळे, मुळे आदींनी पूर्ण केली.

Back to top button
error: Content is protected !!