चिंचोली लिंबाजी माध्यमिक 1991 विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, 32 वर्षांनी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा !!
सचिन गुरव, चिंचोली लिंबाजी, संभाजीनगर लाईव्ह
चिंचोली लिंबाजी येथील माध्यमिकच्या 1991 विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. 32 वर्षानंतर जुन्या आठवणींना यानिमित्त उजाळा मिळाला. केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून काही उपक्रमही यावेळी राबवण्यात आले.
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे 1991 ला दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या सर्व वर्ग मित्रांनी सोशल मीडियाच्या व्हाट्सअप द्वारे एक ग्रुप स्थापन करून काल, दिनांक 19 रोजी चिंचोली लिंबाजी माध्यमिक विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करत व शालेय 1991 जीवनाचा त्या आजपर्यंतचा प्रवास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसतमुख दिसत होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून औरंगाबाद, बीड, मुंबई, चाळिसगाव व अन्य ठिकाणाहून आलेल्या सर्वच माजी विद्यार्थ्यांनी व स्थानिक चिंचोली लिंबाजी येथे शेतकरी असलेले. सर्व माजी विद्यार्थी असा सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता. गुरुजनांच्या हस्ते दीप दीप प्रज्वलन करून कार्याक्रमास सुरुवात झाली. गेट-टुगेदरसाठी आलेल्या माजी विद्यार्थिनींना 1991 साडी देऊन सत्कार करण्यात आला.
चिंचोली लिंबाजी माध्यमिक व प्राथमिक या शाळेला म्हणजे ज्या शाळेत हे सर्व घडले त्या शाळेला 1991 या क्लासमेट ग्रुपने एक साऊंड सिस्टम शाळेला सप्रेम भेट दिला. हा कार्यक्रम इतका भव्य दिव्य होता की परिसरातील माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमावर कौतुकाचा वर्षाव केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ते करत असलेला नोकरी-व्यवसाय याची माहिती जाणून घेतली. जुन्या आठवणीचा उजाळा देऊन गेलेला हा दिवस सगळ्यांच्या स्मरणात राहिलय अजिंठा लॉन्स येथे स्नेहभोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण दहावीच्याच वर्गात आहोत अशी कल्पना हा दिवस देऊन गेला.
भगवान जगन पवार, राजू आनंदा पवार, ग्राम विकास अधिकारी व मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी सुभाष पवार, भगवान धोंडू पवार, शिक्षक असलेले काकासाहेब रामराव पवार, राजेश भुसारे, शैलेश लहाने, सुनील जाधव , सय्यद अझर, अमृत सोमवंशी, रमेश उसरे, दिनकर खरात, विलास निकम, कृष्णा मनगटे, भगवान जंजाळ, बेबी सुतार, माया वैष्णव, वनिता जोशी, ज्योत्स्ना फंड सुरेखा थोरले आदींसह 1991चे वर्ग मित्रांचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe