छत्रपती संभाजीनगर
Trending

गणपती समोर नाचत असताना धक्का लागला, वाद वाढला नंतर मामाच्या घरी जावून डोके फोडले ! छत्रपती संभाजीनगर N-6 सिडकोतील घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – गणपती समोर नाचत असताना धक्का लागल्याने वाद झाला. नंतर आई आणि मुलाने मिळून मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातील एन-6 सिडको परिसरात घडली. यात युवकाचे डोके फुटले. रात्री १० वाजेच्या सुमारास हे भांडण झाले.

अनिकेत उत्तम गायकवाड (वय २४, रा. एन ६, संभाजी कॉलना, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. अजय निमराट व त्याच्या आईने मारहाण केल्याचे अनिकेत गायकवाड याने फिर्यादीत म्हटले आहे.

अनिकेतने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 19/09/2023 रोजी रात्री 09.00 वाजेच्या सुमारास अनिकेत गायकवाड व त्याचे मित्र करन कसारे, शेखर बीडलॉन, आदी गावडे हे कॉलनीतील गणपती उत्सव बघण्यासाठी हनुमान मंदिर एन- 6, सिडको येथे गेले होते. त्याठिकाणी अनिकेत गायकवाड याच्या ओळखीचा अजय विजय निमराट हा तेथे आला होता.

सर्वजण गणतपी समोर नाचत असतांना अनिकेत गायकवाड यास अजय निमराट याचा धक्का लागला. त्यावरुन अनिकेत गायकवाड त्याला म्हणाला की तू मला धक्का का मारला असे म्हणाल्याने त्याने वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर तो त्याच्या घरी जावून त्याच्या आईला बोलावून अनिकेत गायकवाड याचे मामा विजय कसारे यांच्या घरी ई सेक्टर, एन-6 सिडको येथे गेले.

तेथे त्यांचेशी वाद घालू लागले. त्यावरुन अनिकेत गायकवाड हा सदर ठिकाणी रात्री 10.00 सुमारास गेला असता त्याच्या आईने अनिकेत गायकवाडला हाताचापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी अनिकेत गायकवाड याची आई व बहीण आली असता त्यांना सुध्दा अजय निमराट व त्याच्या आईने मारहाण केली.

दरम्यान, अजय निमराट याने तेथे पडलेला दगड हातात धरुन अनिकेत गायकवाड याच्या डोक्यात मारून जखमी केले. अनिकेत गायकवाडच्या डोक्यातून रक्त येत असल्याने तो जोरात ओरडल्याने तेथील लोकांनी मध्यस्ती करून भांडण सोडवले. यानंतर जखमी अनिकेतने पोलिस ठाणे गाठून घाटीच्या अपघात विभागात औषधोपचार घेतला.

अनिकेत उत्तम गायकवाड (वय २४, रा. एन ६, संभाजी कॉलना, छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून अजय निमराट व त्याच्या आईवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!