देश\विदेशराजकारण
Trending

राहुल गांधींची बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी एजंटसोबत स्कूटीवरून राईड !

नवी दिल्ली, दि. ७: सध्या कर्नाटकात निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाचा प्रचार करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी डिलिव्हरी एजंटच्या स्कूटरवरून राईड मारल्याने चर्चेचे फड झडत आहे.

आज रविवारी बंगळुरूमधील काँग्रेस समर्थकांनी या परेडचे स्वागत केले. या अनोख्या स्कुटर परेडचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये असे दिसत आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदा रडणाऱ्या मुलाला शांत करताना दिसत आहेत. त्यानंतर ते डिलिव्हरी एजंटसोबत स्कूटरची सैर करतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राहुल गांधी स्कुटरवर मागे बसचाच हेल्मेट घालतात. यामुळे वाहतुकीच्या नियमाचा धडाही त्यांनी यानिमित्ताने दिला आहे. डिलेव्हरी एजंट पुढे आणि मागे राहुल गांधी अशी दोघांची स्कुटर सैर सुरु होते.

स्कुटरची ही सैर समर्थकांना ऊर्जा देणारी ठरली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दोन किलो मीटरचा प्रवास स्कूटरवरून केल्याने समर्थकांमध्ये एक चांगला संदेश पोहोचला आहे.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधीनी अर्धा अधिक भारत पादाक्रांत केला. यादरम्यान सर्व सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. जाहीर सभेबोरोबरच स्कुटरची सैर करून जनतेच्या मनात पोहोचण्याचा हा राहुल गांधीचा प्रयत्न निवडणुकीत किती यशस्वी ठरतो, हे येणारा काळच ठरवेल.

Back to top button
error: Content is protected !!