छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील पानटपरींवर गुन्हे शाखेची छापेमारी ! शाळा, महाविद्यालय परिसरात मोहीम, २१ जणांवर गुन्हे !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५-  शहरातील विविध भागातील तंबाखुजन्य पदार्थाची जाहिरात करणारे पानटपरी चालकावर व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणारे इसमांवर गुन्हे शाखेकडून करवाई करण्यात आली. २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रामुख्याने शाळा, महाविद्यालय परिसरात ही मोहीम राबवण्यात आली.

सार्वजनिक ठिकणी धुम्रपान करणे, तंबाखु युक्त पदार्थाची जाहिरात, 18 वर्षा खालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखु, सुपारी, पान मसाला, गुटखा व इतर तंबाखुजण्य पदार्थाचे सेवन करणे व थुंकण्यास मनाई आहे. सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने ( जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियम) अधिनियम 2003 अन्वये तसेच महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2012 मध्ये प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, सुंगधीत तंबाखु व सुपारी व इतर तत्सम पदार्थ यांचे उत्पादन, वाहतुक, विक्री, साठा व वितरण यावर बंदी घातलेली आहे.

शहरातील विविध ठिकाणी पानटपरी चालकांनी केलेला गुन्हा हा मानवतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर येथील पथकांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालये अशा विविध भागांत अचानकपणे छापे मारून टपरी/पानटपरी चालक/मालक यांचे विरुध्द धडक मोहीम राबवली.

1) शेख कासीफ शेख नवाब, मध्यवर्ती बसस्थानकाचे समोर, 2) अजीज खान युसुफ खान, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, 3 ) शेख मोहसिन शेख फरीद, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, 4) जीयाऊद्दीन जमीरुद्दीन, बढीलाईन, 5) शेख आश्पाक शेख इसाक, बुढीलाईन, 6) अब्दुल वाहेद अब्दुल रशीद, बुढीलाईन, 7) आरबाज खान इक्बाल खान, बुढीलाईन, 8) मुश्ताक शेख मोहम्मद शेख, बढीलाईन,

9) मोहम्मद फैजान मोहम्मद आतीफ, टाऊन हॉल, 10) निखील सुभाष मुंढें, मिलींद कॉलेज समोर, 11) शेख नासेर शेख तमीजउद्दीन, मिलींद कॉलेज समोर, 12) विजय रामदास काजळे, विवेकानंद कॉलेज समोर, 13) दीपक नारायण रोहंगे, जुने हायकोर्ट समोर, 14) सुनिल सोपान कांबळे, क्रांतीचौक, 15 ) अनिल वाकेकर, दुधडेअरी समोर, 16 ) शोएब वहाब शेख, मोंढा नाका, 17 ) शेख जावेद शेख इब्राहीम, एमजीएम कॉलेज समोर, 18) शेख सुभान शेख बन्नु, एमजीएम कॉलेज समोर,

19 ) बाळु उत्तम आपासरे, कॅनॉट प्लेस सिडको, 20) अरुण छगनराव आवाळे, कॅनॉटप्लेस, 21) मिर्झा इम्रान बेग, कॅनॉटप्लेस आदी ठिकाणचे पानटपरी धारक यांच्या विरुध्द प्रतिबंधीत तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ (विक्री, विपणन, आवेष्टन जाहिरात ) नियंत्रण कायदा 2003 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, मा. पोलीस उप आयुक्त (मुख्यालय.) अपर्णा गिते व सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे, पोउपनि प्रविण वाघ, पोउपनि विठ्ठल जवेखेडे व पोलीस अंमलदार योगेश नवसारे, विजय भानुसे, विजय घुगे, काकासाहेब आधाने, कैलास काकड, जालीदंर रंधे, मनोज चव्हाण, प्रकाश चव्हाण, पोउपनि अजहर कुरेशी सर्व नेमणुक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!