छत्रपती संभाजीनगर
Trending

भोकरदनच्या तक्रारदाराकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्याने चार हजारांची लाच घेतली ! संगणकाच्या कामाचे ६५ हजारांचे बिल ट्रेझरीमध्ये दाखल करण्यासाठी घेतली लाच !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – भोकरदनच्या तक्रारदाराकडून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्याने चार हजारांची लाच घेतली. संगणकाच्या कामाचे ६५ हजारांचे बिल मंजूर करून ट्रेझरीमध्ये दाखल करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणई आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महेश भालचंद्र चौधरी (वय 50 वर्ष, पद :- लेखाधिकारी, वर्ग २, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर रा. C/o प्लॉट नंबर 20 संतोष सोनी शांतिनाथ हाऊसिंग सोसायटी गादिया विहार छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार ओम एंटरप्राइजेस भोकरदन येथे संगणक दुरुस्ती व देखभालीचे काम करत असून त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात संगणक दुरुस्ती ,नवीन अँटिव्हायरस टाकने, प्रिंटर दुरुस्ती याप्रमाणे इतर संगणकाचे केलेल्या कामाचे 65,156/- रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व ट्रेझरीमध्ये दाखल करण्यासाठी पंच साक्षीदार समक्ष रुपये 4000/- रक्कमेची लाचेची मागणी केली. त्यानंतर पंच साक्षीदार समक्ष 4000-/ रुपये स्वतः स्वीकारले. आरोपी महेश भालचंद्र चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संगीता एस पाटील पोलीस उपाधिक्षक, सापळा पथक पो हवा तोडकर, पाठक, पो.अ. विलास चव्हाण चालक पोअं ठाकुर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!