छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: अधिसभा, विद्या परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात; दुपारी एक वाजेपर्यंत पहिला निकाल अपेक्षित !

- मतमोजणीसाठी २४० जणांची नियुक्ती

 औरंगाबाद, दि.१३: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी १० वाजता सुरु झाली. सर्वच गटासाठींची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात आली असून यासाठी पहिल्या शिफ्टमध्ये ८० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रिया राबण्यिात आली.या निवडणुकीत अधिसभेच्या २५ व विद्यापरिषदेच्या सहा जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. दोन्ही गटात मिळून तीन जागा बिनविरोध आल्या असून तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. या निवडणुकीत प्रवर्गनिहाय निवडणूक झालेल्या जागा, उमेदवार व मतदारांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे :-

अधिसभा : विद्यापीठ शिक्षक – ३ जागा, ९ उमेदवार, १२८ मतदार

संस्थाचालक : ४ जागा, ८ उमेदवार, १६९ मतदार

प्राचार्य : ८ जागा, १४ उमेदवार, ७८ मतदार

महाविद्यालयीन शिक्षक : १० जागा, ३९ उमेदवार, २ हजार ५८७

तर विद्यापरिषदेच्या – ६ जागांसाठी १९ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार  होते. विद्या परिषद या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविदृयालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार होते. निवडणूक विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

तीन जण बिनविरोध

अधिसभेच्या तीन जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवार वैध ठरल्यामुळे या जागा बिनविरोध आल्या आहेत. यामध्ये संस्थाचालक महिला गटातून अर्चना बाळासाहेब चव्हाण (अर्चना रमेश आडसकर), व नितीन उत्तमराव जाधव (अनूसूचित जमाती प्रवर्ग) तसेच (अनूसूचित जमाती प्राचार्य प्रवर्गातून) डॉ.शिवदास झुलाल शिरसाठ हे बिनविरोध निडणून आले आहेत.

१३ अभ्यास मंडळे बिनविरोध

 दुस-या टप्प्यात ४ विद्याशाखेतील ३८ अभ्यासमंडळासाठी निवडणूक झाली. यामध्ये मानव्यविद्या (१३), विज्ञान व तंत्रज्ञान (१३), वाणिज्य व व्यवस्थापन (पाच) तर आंतरविद्याशाखेतील (सात) अभ्यासमंडळाचा समावेश आहे. यातील ऊर्दू, मानसशास्त्र, मत्स्यशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरींग, प्राणीशास्त्र, एमबीए, बी.पी.एड, शैक्षणिक प्रशासन, शैक्षणिक तत्वज्ञान, शारीरिक शिक्षण शिक्षक या १३ अभ्यासमंडळाची निवडणुक बिनविरोध झाली. तर सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसिजर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स – टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए या सहा अभ्यासमंडळात एकही पात्र उमेदवार मिळाला नाही. उर्वरित एकूण १९ अभ्यासमंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यासाठी १२४ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार होते. या सर्व अभ्यासमंडळाची मतमोजणीही मंगळवारी सकाळी सुरू झाली. या निकालासोबतच बिनविरोध आलेल्या सदस्यांचेही प्रमाणपत्र मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

मतमोजणीसाठी २४० जणांची नियुक्ती

क्रीडा विभागातील बॅडमिंटन हॉलमध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु झाली. मतमोजणीसाठी तीन सत्रात मिळून ७० शिक्षक, १४० अधिकारी-कर्मचारी तसेच ३० वर्ग चार कर्मचारी अशी २४० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरु करण्यात येईल. यावेळी अधिष्ठाता, उपकुलसचिव यांची निरीक्षक म्हणून नियुकती करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली. दरम्यान, मतमोजणी कक्षात मंगळवारी सकाळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, निवडणूक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ.सतीश पाटील, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.राम चव्हाण, डॉ.विष्णु क-हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब आदींसह प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत.

दरम्यान, अधिसभा विद्यापरिषद व अभ्यास मंडळाच्या सर्वच गटातील मतमोजणी सकाळी दहा वाजता एकाच वेळी सुरू करण्यात आली असून दुपारी एक वाजेपर्यंत पहिला निकाल अपेक्षित आहे .

Back to top button
error: Content is protected !!