छत्रपती संभाजीनगर
Trending

संतापजनक: स्कूल व्हॅनमध्ये किस करून विद्यार्थिनीला धमकावले, घरी सांगितले तर बैलाच्या मटनाची बिर्याणी खातात म्हणून धमकी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ –  स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनीशी किस करून धमकावल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना सोनामाता बालक मंदिर शाळेच्या पाठिमागे घडली. ही घटना घरी सांगितली तर तुम्ही शाळेच्या बाजुला असलेल्या नाल्यात हातपाय धुतात व बैलाच्या मटनाची बिर्याणी खातात असे तुमच्या घरी सांगेल अशी धमकीही आरोपींनी पीडितेला दिली.

विकास विठठलराव बनकर (वय 38 वर्षे रा.आंबेडकरनगर गल्ली नं 10, औरंगाबाद), व्हॅन चालक राजु मोहन रुपेकर (रा. पिसादेवी औरंगाबाद) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याव सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी विकास विठठलराव बनकर याने आरोपी व्हॅन चालक राजु मोहन रुपेकर याच्याशी संगणमत केले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलींना सोनामाता बालक मंदिर शाळेतून ने आण करण्यासाठीच्या स्कूल व्हॅन चालकास सदर वाहन शाळेमागे बाजूला लावण्यास सांगितले.

सदर वाहनामध्ये बसलेल्या पीडित मुलगी व तिच्या मैत्रिनी या सोनामाता बालक मंदिर शाळेच्या मागे व्हॅनमध्ये बसलेल्या होत्या. यावेळी आरोपी विकास विठठलराव बनकर याने मुलीसोबत किस करून करून असभ्य वर्तन केले. याबद्दल घरी काही सांगितले तर तुम्ही शाळेच्या बाजुला असलेल्या नाल्यात हातपाय धुतात व बैलाच्या मटनाची बिर्याणी खातात असे तुमच्या घरी सांगेल अशी धमकीही आरोपींनी त्या मुलीला दिली.

याप्रकरणी विकास विठठलराव बनकर (वय 38 वर्षे रा.आंबेडकरनगर गल्ली नं 10, औरंगाबाद), व्हॅन चालक राजु मोहन रुपेकर (रा. पिसादेवी औरंगाबाद) या दोघांवर सिडको पोलिस ठाण्यात 595/2022 कलम 354, 354 (A), 354 (D), 506, 34, भादंवी सह कलम 7,
8, 9 (g), 16 बा.लै.अ.सं .कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बायदंडे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!