छत्रपती संभाजीनगर
Trending

पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ३१ मे पासून परीक्षा ! बीड, जालना, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ७८ केंद्र !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमएस्सी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ मे तर एम ए व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जून पासून सुरु होणार आहेत. दोन्ही मिळून ३२ अभ्यासक्रमांसाठी ७८ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.

पदवी अभ्यासक्रमाच्या २१ मार्च ते १६ एप्रिल या काळात घेण्यात आल्या असून उत्तरपत्रिका मुल्याकंनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या पॅटर्न २०२१ परीक्षा या दिवशी सुरु होतील.

एम.एस्सीच्या परीक्षा ३१ मे रोजी सुरु होणार आहेत. तर एम कॉम परीक्षा सहा जून पासून सुरू होणार आहेत. एम ए तसेच बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएड, एलएलबी, एलएलएम, एमबीए, अभियांत्रिकी, फार्मसी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जून पासून सूरू होणार आहे.

दरम्यान, जून ’२०१५’च्या पॅटर्नप्रमाणे पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मे पासून ७८ केंद्रावर सुरु आहेत. चार जिल्हयातील ७८ केंद्रावर ही परीक्षा होणार असून यामध्ये सर्वाधिक ३१ केंद्र छत्रपती संभाजीनगर जिल्हयात आहेत तर बीड जिल्हयातील २१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल. जालना व उस्मानाबाद जिल्हयात प्रत्येकी १३ केंद्र आहेत, अशी माहिती परीक्षा विभागातील उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!