छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: नवीन महाविद्यालयासंदर्भात ऑनलाईन सर्वेक्षण !

नागरिकांनी माहिती नोंदविण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुढील पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात विद्यापीठाच्यावतीने ऑनलाईन सर्वोक्षण करण्यात येणार आहे.

या संदर्भात कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम सिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे सर्व अधिष्ठाता यांची नुकतीच बैठक होऊन बृहत आराखडयासंदर्भात चर्चा करण्यात आली. यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील नागरिक, शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थी यांच्याकडून सूचना मागविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्व सन्माननीय माजी विद्यार्थी, पालक-नागरिक,लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उद्योजक / व्यावसायिक, शिक्षण तज्ञ कुलगुरु, प्र-कुलगुरु, अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, तत्सम व्यक्ती व सर्व संबंधीतांना आवाहन करण्यात येते की, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. बृहत/२०२३/प्र.क्र.०५/ विशी-५ दिनांक १६/०१/२०२३ नुसार या विद्यापीठाचा सन २०२४-२०२९ या पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करावयाचा आहे.

त्या अनुषंगाने व नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षण आवश्यक असुन सध्या कार्यरत असलेल्या महाविद्यालय आणि संस्थेत चालु असलेले अभ्यासक्रम / नविन महाविद्यालय या बाबत आपल्या भागात कोणत्या अभ्यासक्रमाची नविन महाविद्यालयाची आवश्यकता आहे. या बाबत सर्वोक्षण करण्यासाठी या सोबत दिलेलया लिंकवर प्रश्नावली दिलेली आहे, तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२४-२०२९ या पाच वर्षांचा बृहत आराखडा सर्व समावेशक व आपल्या विभागाच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी सोबतच्या लिंकवरील प्रश्नावली ऑनलाईन लिंक –
 http://online.bamu.ac.in/unic/perspective_plan_survey.php भरावी असे आवाहन डॉ.भगवान साखळे यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!