पदव्युत्तर प्रवेशाची यादी शनिवारी घोषित होणार, १७ ते २२ जुलै दरम्यान स्पॉट अॅडमिशन !
विद्याशाखानिहाय विद्यार्थ्यांची यादी
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभागातील अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम सर्व साधारण गुणवत्ता यादी शनिवार, ८ जुलै रोजी घोषित होणार आहे. विद्याशाखाय ही यादी घोषित होणार असून पुढील आठवडयात ’समुपदेशन फेरी’ होणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या ऑनलाईन नोंदणीस यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व ४५ विभाग तसेच धाराशिव उपपरिसर येथील सर्व १० विभागात ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ५ ते २६ जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली.पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण ४ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली.
ऑनलाईन अर्ज दुरुस्तीसाठी १ ते ३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. विद्यापीठ मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्यात आली. या संदर्भात प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश समितीची बैठक शुक्रवारी (दि.सात) झाली. बैठकीस पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. आय आर मंझा , युनिकचे यशपाल साळवे यांच्यासह प्रवेश समितीचे २२ सदस्य उपस्थित होते.
१ जुलै रोजी रोजी प्राथमिक यादी घोषित करण्यात आली . तर ८ जुलै रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. ११, १५ व १७ जुलै रोजी समुपदेशन फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पदव्युत्तर विभागातील कर्मचारी ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत .
१७ ते २२ जुलै दरम्यान ’स्पॉट अॅडमिशन’
’ऑनलाईन’नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना १७ ते २२ जुलै दरम्यान ’स्पॉट अॅडमिशन’ प्रक्रियेद्वारे सर्व विद्यार्थ्यांना रिक्त जांगावर प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश समितीच्या संख्यासमवेत मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी बैठक घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्याचे आदेश दिले. या काळात विद्यार्थ्यांनी संबंधित विभागात ’स्पॉट अॅडमिशन’ घ्यावेत, असेही पदव्यूत्तर विभागप्रमुखांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe