छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची २२ डिसेंबरपासून परीक्षा !

Story Highlights
  •  एकूण १६ हजार ९१३ परीक्षार्थी
  •  चार जिल्हयात ११० परीक्षा केंद्र
  •  १०  भरारी पथकांची स्थापना

संभाजीनगर लाईव्ह, दि.१४:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या २२ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. एकूण १६ हजार ९१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी सुरु आहे. बी.ए., बी.एस्सी व बी.कॉम अभ्यासक्रमाची द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा यापूर्वी सुरू झाल्या आहेत . तर प्रथम वर्ष व अन्य व्यावसायिक पदवी, अभ्यासक्रम, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा नंतर होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी चार जिल्हयात ११० परीक्षा केंद्र असून १६ हजार ९१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

सर्वांधिक ९ हजार ८०२ विद्यार्थी विज्ञान शाखेतून (एम.एस्सी ) परीक्षा देणार आहेत. कला व सामाजिकशास्त्र शाखेतून ३ हजार ८२५ तर वाणिज्य विद्याशाखेतून ३ हजार २८६ जण परीक्षा देणार आहेत. चार जिल्हयात १० भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी १० ते १ तर दुपारी २ ते ५ दरम्यान पेपर होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात व शांतपणे पेपर द्यावेत, असे आवाहन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाची जानेवारीत परीक्षा
दरम्यान, पदवी व पदव्यूत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा जानेवारीच्या दुस-या आठवडयात होणार आहे. बी.ए., बी.एस्सी व बी.कॉम प्रथम सत्राच्या परीक्षाही २२ डिसेंबरपासून होणार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!