छत्रपती संभाजीनगर
Trending

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना पतसंस्थेच्या सभेत १० टक्के लाभांशाचा प्रस्ताव मंजूर, कर्जाच्या रकमेवर विमा बंधनकारक !

अधिकारी संघटना पतसंस्थेची सभा उत्साहात

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोजी उत्साहात पार पडली. सभेत संचालक मंडळाने सादर केलेला १० टक्के लाभांशाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पतसंस्थेच्या इमारतीसाठी निधी जमा करणे, कर्जदारांना कर्जाच्या रकमेवर विमा बंधनकारक करणे, नवीन संचालक निवडणे या विषयांवरही सभेत साधकबाधक चर्चा करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या सभागृहात झालेल्या सभेत महापारेषण परिमंडल कार्यालय औरंगाबाद मधील एकूण आकरा सभासदांनी नवीन सभासदत्व स्वीकारले त्या बद्दल सरचिटणीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मागील वर्षभराच्या कार्य काळामध्ये संपर्क अभियान दौऱ्याच्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाच्या सहकार्याने सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे / पतसंस्थेचे एकूण १६८ जणांनी सभासदत्व स्वीकारले.

या प्रसंगी मंचावर पतसंस्थेचे अध्यक्ष आनंत कोंत, पतसंस्था सचिव दिलीप पवार, कोषाध्यक्ष हणमंत गायकवाड, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बागुल, सरचिटणीस संजय खाडे, केंद्रीय सल्लागार गुलाबराव मानेकर,तज्ज्ञ संचालक सतीश तळणीकर यांच्यासह पंतस्थेचे संपूर्ण संचालक मंडळाची तसेच केंद्रीय कार्यकारिणी व परिमंडल अध्यक्ष व सचिव यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या नंतर ०१-०४-२०२३ पासून येऊ घातलेल्या वेतनवाढ करारा संदर्भात देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी पतसंस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संघटनेचे उपसरचिटणीस प्रणेश सिरसाठ, सचिव गणेश बोढरे, सौ.मंजूषा दुसाने, नितीन पारिपेल्ली, डॉ.शिवाजी तिकांडे, पतसंस्थेचे कर्मचारी प्रविण शिंदे, शित्रे व महावितरण-महापारेषणच्या औरंगाबाद परिमंडल कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

Back to top button
error: Content is protected !!