छत्रपती संभाजीनगर
Trending

शैक्षणिक गुणवत्ता वाढ, महाविद्यालयांची प्रवेशक्षमता कमी करण्याच्या धाडसी निर्णयासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे चार वर्षे ! डॉ.प्रमोद येवले यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात विद्यापीठात अनेक प्रकल्प मार्गी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.१६ : शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व गतीमान प्रशासन ही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीची चतुःसूत्री राहिली. तसेच ’कोविड लॅब’सह अनेक उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचीही जोपासना केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ.प्रमोद येवले यांनी १६ जुलै २०१९ रोजी स्वीकारली. कुलगुरुपदाच्या त्यांच्या यशस्वी कारकिर्दीस रविवारी चार वर्षे झाली. या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीच्या लेखाजोखा, या काळातील महत्वपूर्ण घटना-घडामोडीचा हा लेखाजोखा…

चार वर्षांत एकूण पाच दीक्षांत समारंभ- पहिल्याच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात डॉ.येवले यांनी ध्वजारोहणची केवळ जागाच बदलली असे नव्हे तर प्रशासनाची सूत्रे बदलण्याचे संकेत दिले. त्याप्रमाणे प्रशासनात गतिमानता व पादरदर्शकता आणण्यासाठी फाईल ट्रँकिंग सिस्टीम सुरु केली. विद्यापीठाच्या सर्व फाईल आता ’ऑनलाईन’ पध्दतीनेच यशस्वीपणे मार्गी लागत आहेत. शिक्षण समारंभ दीड वर्षापासून प्रलंबित होता. वर्षभरातच दोन दीक्षांत सोहळे यशस्वीपणे घेण्यात आले. चार वर्षांत एकूण पाच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. गेली पाच वर्षे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली. पदवीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसराची गोडी लागावी म्हणून जाणीवपूर्वक विद्यापीठात परिसरात युवक महोत्सवाचे आयोजन केले.  यंदापासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी युवक महोत्सवाचा समावेश होणार आहे.

महामारी काळात जपली सामाजिक बांधिलकी:- करोनाच्या काळात दोन ‘कोविड टेस्टिंग लॅब’ उभा करणारे आपले एकमेव विद्यापीठ ठरले. या संदर्भातील महत्वपूर्ण असा ’व्हायरॉलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरु केला. ’पीएच.डी’चे सपूर्ण प्रवेश प्रक्रिया ’ऑनलाईन करण्यात आली. आजघडीला ४ हजार ८०० विद्यार्थी संशोधन करीत असून १ हजार ९७५ विद्यार्थ्यांना ’रिसर्च फेलोशिप’ प्राप्त झालेली आहे. कोविड काळात विद्यापीठ निधी, शिक्षक कर्मचारी वेतनातून जवळपास सव्वा कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला.

भरती प्रक्रिया ऑनलाईन- महाविद्यालयांच्या संलग्नतेपासून ते शिक्षकभरती जाहिरात संपूर्ण प्रक्रिया ’ऑनलाईन’ करण्यात आली. प्राध्यापकांसाठी ’मायनर रिसर्च प्रोजक्ट’ अंतर्गत ३३ प्रकल्पांची निवड करुन ४२ लाखांचा निधी दिला. विद्यापीठ ’आयपीआर सेल’ अंतर्गत चार वर्षात १० पेटंटस व १० कॉपीटाईसची नोंदणी करण्यात आली. स्वतः कुलगुरु यांनाही या काळात तीन पेटंटस् मिळविले. पदव्युत्तर व व्यावसायिक ’ऑनलाईन’ मुलाकंन सुरु केले. तसेच कोविड काळात ऑनलाईन परीक्षा व निकाल यशस्वीपणे राबविण्यात आले. विद्यापीठ निधीतून कंत्राटी व तासिका तत्वावर प्राध्यापक भरती करण्यात आली. एम.फार्मसी, आर्टिफिशिएल इंटेलिजिएन्स, फॉरेन्सिक सायन्य आदी नवीन विभाग सुरु करण्यात आले.

महाविद्यालयांची प्रवेशक्षमता कमी करण्याचा धाडसी निर्णय- तीन टप्प्यांत मिळून ३९१ महाविद्यालयांचे ’अ‍ॅकडमिक ऑडिट’ करण्यात आले. कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधांचा अभाव असणाऱ्या महाविद्यालयांची प्रवेशक्षमता कमी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. अखिल भारती कॉमर्स काँग्रेस, पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद, राज्य क्रीडा महोत्सव, जी-२० समीट लेक्चर सिरीज चे यशस्वी आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुताळयाीच उभारणी केली. विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण. साडेआठ कोटी रुपये खर्चून सिंधेटिक ट्रॅक उभारणीचे काम सुरु करण्यात आले. अटल इन्क्युबूशन सेंटर अंतर्गत ४६ स्टार्टअपची नोंदणी. साडे आठ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला.

विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने चार पावले पुढे- विदेशी विद्यार्थी वसतिगृह, विधि विभाग, पॉल हर्बट रिर्सच सेंटर सह नवीन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. याप्रमाणे विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने चार पावले पुढे गेला. विद्यापीठाची अधिसभा, विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषद, अभ्यास मंडळ या सर्व निवडणुका अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेण्यात आल्या. तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले संतपीठ सुरू करण्यात आले . तरेन पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा यांच्या डॉ. येवले यांच्या कार्यकाळातच झाला. आगामी शैक्षणिक वर्षातही वेळापत्रकाचे काटेकोर पालक करुन ’डिसेंबर’मध्ये दीक्षांत समारंभ, सप्टेंबर महिन्यात युवक महोत्सवाचे आयोजन कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले आहे.

विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रामाणिक: कुलगुरू
चार दशकांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील चार वर्षे छत्रपती संभाजीनगर येथे मनासारखे काम करता आले याचा मला आनंद आहे. पहिल्या पिढीचे पदवीधर घडविणारे व वंचित, कष्टकरी व शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणारे म्हणून आपले विद्यापीठ ओळखले जाते. बाबासाहेबांनी छत्रपती संभाजीनगरला शिक्षाभूमी तर नागपूरला दीक्षाभूमी ही ओळख करून दिली. त्यांच्याच आशीर्वादामुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले . उर्वरित कार्यकाळातही विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली

Back to top button
error: Content is protected !!