राजकारण
Trending

धनुष्यबाण रावणाला मिळत असेल तर असत्यमेव जयते म्हणावे लागेल ! बाळासाहेबांनी उभा केलेली शिवसेना ४० बाजार बुणग्यांनी विकत घेतली: खासदार संजय राऊत

मुंबई, दि. १७ – निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते. ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच. खोके चमत्कार झाला! लढत राहू, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळाले असून तसा निकाल निवडणूक आयोगाने आज सायंकाळीच दिला आहे. या निकालावर खासदार संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया देऊन निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था नसल्याचीही टीका केली.

बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असून निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा हास्यास्पद आणि महाराष्ट्रातील राजकारणातला मोठा विनोद आहे. मूळात शिंदे गट आणि भाजपाने ही स्किप्ट आधील लिहली होती, आणि तसा दावा ते अनेक दिवसांपासून करत होते. यामुळे हा निकाल कसा आला हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक असल्याचेही राऊत म्हणाले.

मुळात धनुष्यबाण उचलण्याची पेलण्याची ताकद त्यांची नाही. इतिहासातले दाखले पहा, रावणाने सीतेच्या स्वयंवरातील धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला. पुढे काय झाले तर तेच धनुष्यबाण रावणाच्या छाताडावर पडले. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो की शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि आमचीच आहे, असेही राऊत म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!