छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगरात ईडीची नऊ ठिकाणी छापेमारी ! महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील महाघोटाळा प्रकरण !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – छत्रपती संभाजीनगरात ईडीने नऊ ठिकाणी छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील कोट्यवधी रुपयांची घरे बांधण्यासाठी ज्या निविदा दाखल करण्यात आल्या होत्या या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि हेराफेरीचा आरोप आहे. महानगरपालिकेने यासंदर्भात शहरातील सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दिली होती. दरम्यान, प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन ईडीने यात उडी घेतली होती व संपूर्ण कागदपत्रे व प्रकरणाची फाईल ताब्यात घेतली होती. याप्रकरणात आज, १७ मार्च रोजी सकाळपासून ईडीने तीन संशयितांच्या नऊ ठिकाणी छापेमारी टाकली. प्रकरणाशी संबधीत कागदपत्रांची तपासणी ईडीचे अधिकारी करत आहेत.

जाणून घ्या मूळ प्रकरण काय आहे –

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) संदर्भाने करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे समोर आले आहे. निविदेच्या अटींचा भंग तर केलाच असून शिवाय खोटी माहिती देऊन मनपाची फसवणूक केल्याची तक्रार महानगरपालिकेच्या उपायुक्त २ तथा प्रधानमंत्री आवास योजनेच्या विभाग प्रमुख अपर्णा कृष्णकुमार थेटे यांनी सिटी चौक पोलिसांत दिली आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची घरे बांधण्यासाठी या निविदा दाखल करण्यात आल्या होत्या.

महानगरपालिकेच्या उपायुक्त २ तथा प्रधानमंत्री आवास योजनेच्या विभाग प्रमुख अपर्णा कृष्णकुमार थेटे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, महानगरपालिका औरंगाबाद कार्यक्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शासकीय जमिनीवर खाजगी भागीदारीने (PPP. DROH) घटक क्र.3 प्रतिकृती क्र.5 अंतर्गत गृह प्रकल्प उभारण्याकरिता संदर्भ क्र. १ प्रमाणे निवीदा प्रक्रीया राबविण्यात आली होती.

निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर प्राप्त कागदपत्रांआधारे निवीदाकार समरथ कंन्स्टक्शन ॲण्ड जे. व्ही. यांना पडेगाव गट क्र.69 येथील 3.16 हेक्टर क्षेत्र, हर्सूल गट क्र.2161.02 हेक्टर क्षेत्र आणि तीसगाव 225/1 15.05 हेक्टर क्षेत्र, तीसगाव 227/186.25 हेक्टर क्षेत्र या करीता LOA-1 संदर्भ क्र.2 नुसार निर्गमित करण्यात आला होता. तसेच निवीदा प्रक्रियेनंतर प्राप्त झालेल्या शासकीय जमिनीवर प्रकल्प उभारण्याकरिता संदर्भ क्र. 3 नुसार चिकलठाणा गट नं. 473 क्षेत्र 6.72 हेक्टर सुंदरवाडी गट नं.9 व गट नं. 10 क्षेत्र 15.78 हेक्टर या LOA-2 निर्गमित करण्यात आला होता.

निवीदा प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडली आहे काय याची शहानिशा करताना असे निदर्शणास आले की, सदरील निविदेअंतर्गत पात्र ठरलेले तीन निविदाकार १. समरथ मल्टीबीज इंडिया प्रा. लि. 2. इंडोग्लोबल इंफ्रास्ट्रक्चर सर्विसेस 3. जॅगवार ग्लोबल सर्विसेस या तीनही निवीदाकारांनी एकाच आय.पी. (I.P. Address) 103.211.61.184 यावरुन अनुक्रमे 02 मार्च 2022 वेळ 01.52 वा. 03 मार्च 2022 वेळ 08.11 वा. आणि 03 मार्च 2022 वेळ 01.11 वा. दाखल केले आहेत.

तिन्ही पात्र निविदाकार एकाच आय.पी. अँड्रेसवरून निविदा दाखल केली असल्याने निवीदेतील अट 17.17.3.V मधील “restrictive practice” means forming a cartel or arriving at any understanding or arrangement among Bidders with the objective of restricting or manipulating a full and fair competition in the Bidding Process चा भंग केल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर निविदे प्रक्रियेत या तीन्ही निवीदाकारांनी महानगरपालिकेची जाणिवपूर्वक फसवणूक करणे, अप्रामाणिक हेतूने शासनाचे आर्थीक नुकसान करण्याचे उद्देशाने व स्वतःचा फायदा करून घेण्यास गैरमार्गाचा अवलंब केल्याचा दिसून येत आहे.

शिवाय असेही निदर्शणास आले आहे की, मे समस्य कंन्ट्रक्शन अॅण्ड जे.व्ही. यांना निविदा प्रक्रियेनंतर निविदेतील अट क्र. 17.5 Once Bidder gets work of Affordable Housing Project (AHP) under Pradhan Mantri Awas Yojana Unit No. 3, and if the work of Affordable Housing Project (AHP) is proposed to be undertaken in new premises within Aurangabad Municipal Corporation limits, instead of publishing new tender, if the selected Bidder working on the AHP project of AMC, is ready to take up the new AHP work at the sanctioned rate; then the same Bidder shall be given consideration नुसार अतिरिक्त प्राप्त तीन जमिनींवर चिकलठाणा गट नं. 473, सुंदरवाडी गट नं.9 गट नं. 10 क्षेत्र या करिता प्रधानमंत्री आवास योजना (श) अंतर्गत प्राप्त वाढीव जागेकरिता प्रकल्प राबविण्यासंदर्भाने संमती आहे का अशी विचारणा केली असता संबंधीताने आर्थिक क्षमता नसताना देखील व आर्थिक क्षमतेबाबत माहिती लपवून लेखी संमती दिली.

त्या आधारे महानगरपालिकेने संबंधीतास या वाढीव क्षेत्राकरीता LOA-2 निर्गमित केला. संबंधीताचे आर्थिक क्षमता नसल्यामुळे महानगरपालिकेचा सदरील जागेवरील प्रकल्प अद्यापदेखील कार्यान्वित झाला नाही. यामुळे महानगरपालिकेची फसवणून झालेली आहे. निविदेतील 17.17.3 ।।। चा भंग झालेला आहे. “fraudulent practice” means a misrepresentation or omission of facts or suppression of facts or disclosure of incomplete facts, in order to influence the Bidding Process यावरुन संबंधिताने वाईट उद्देशाने म्हणजेच महानगरपालिकेचे व शासनाचे आर्थिक नुकसान करणे व स्वतःचा फायदा करुन घेण्यासाठी लबाडीने कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच महानगरपालिकेची कोणतीही फसवणूक केली नाही असे खोटे शपथपत्र निविदेसोबत दिले.

या बाबीवरून सर्व संबंधितांनी जाणिवपूर्वक सहेतु शासनाचे आर्थिक नुकसान करणे, महानगरपालिकेची फसवणूक करण्याचे उद्देशाने एकत्रितरित्या संगनमताने वरील प्रमाणे एकाच कंत्राटदारास समरथ कंन्ट्रक्शन अॅण्ड जे.व्ही. यांनी महानगरपालिकेची निविदा मिळविली आहे. सदरील निवीदा मिळविण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व संबंधिताची नांवे व तपशिल खालील प्रमाणे-

१) समरथ कंन्ट्रक्शन अॅण्ड जे. व्ही. तर्फे

1. समरथ मल्टीबीज इंडीया प्रा. लि. चे संचालक अमर अशोक बाफना मुख्य भागीदार, फ्लॅट नं. 101, बगीचा सवाईवाला अपार्टमेंट, नाझगल्ली पानदरीबा औरंगाबाद. 2. पूजा अमर बाफना संयुक्त भागीदार, फ्लॅट नं. 101, बगीचा सवाईवाला अपार्टमेंट, नाझगल्ली पानदरीबा औरंगाबाद. 3. मे. सिध्दार्थ पारपर्टीजचे भागीदार निलेश वसंत शेंडे 14 स्वागत क्लासिक, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, पुणे 411 016, 4. अभिजित वसंत शेंडे, 14, स्वागत क्लासिक, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, पुणे 411016, 5. योगेश रमेश शेंडे, 14, स्वागत क्लासिक, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, पुणे 411016, 6.स्वप्नील शशिकांत शेंडे, 14, स्वागत क्लासिक, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, पुणे 411016, 7. नवनिर्माण महिला बहुउद्देशिय संस्थाचे प्राधिकृत व्यक्ती हरीष मोहनलाल माहेश्वरी, एस-31, गंगानगर, वाशिम बायपास रोड, अकोला 444001, 8. सुंदर कन्स्ट्रक्शनचे मालक सतिष भागचंद रुणवाल, प्लॉट नं. 49 बी, अहींसानगर, औरंगाबाद- 431 001

२) इंडोग्लोबल इंफ्रास्ट्रक्चर सर्विसेस

1. इंडोग्लोबल इंफ्रा. सर्विसेसचे भागीदार रितेश राजेंद्र कांकरीया, फ्लॅट नं. 301, मीता अपार्टमेंट, नवाबपूरा, औरंगाबाद- 431001, 2.हितेश मनसुख करनावत, 105, संगम हेरीटेज, भोईर कॉलनी, चिंचवड, पुणे- 411033 3. मे. अभिनव रेनबो डेव्हलपर्स अॅण्ड प्रमोटर्सचे भागीदार श्यामकांत जे. वाणी, 506, अभिनव रेसिडेन्सी, भोसले नगर, शिवाजीनगर, पुणे- 411007, 4. सुनील पी. नहार, बी-1006, कस्तुरीकूंज, सीटीएस नं. 2745 ते 2755 शिवाजीनगर, पुणे- 411 007,  5. हरिओम नवोदय बहुउद्देशिय संस्थाचे प्राधिकृत व्यक्ती सुखकर्ता नगरी, सावंगी, वर्धा.

३) जॅगवार ग्लोबल सर्विसेस

1. जागवार ग्लोबल सर्विसेसचे भागीदार सुनील मिश्रीलाल नहार, नवाबपूरा, नवामोंढा, औरंगाबाद. 2. आनंद फुलचंद नहार, 65, सोनारगल्ली, कोर्टरोड, जामखेड, अहमदनगर- 413 201, 3. न्याती इंजिनिअर्स अॅण्ड कन्सलटन्ट प्रा. लि. संचालक  नितीन व्दारकादास न्याती सीटीएस नं. 1195, 1196-बी, 103/129 न्याती युनिट्री, नगररोड, येरवडा, पुणे- 411006,  4. पियुश नितीन न्याती सीटीएस नं. 1195, 1196-बी, 103/129 न्याती युनिट्री, नगररोड, येरवडा, पुणे, 5. प्रविन नितीन न्याती सीटीएस नं. 1195, 1196-बी, 103/129 न्याती युनिट्री, नगररोड, येरवडा, पुणे, 6. गुंजल अॅण्ड असोसिएट्सचे प्राधिकृत व्यक्ती मनोज अर्जून गुंजल, प्लॉट नं. 97, स.नं. 70, एन-2 सिडको, ठाकरेनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद- 431001

तीनही निविदाकार कंपनी व त्यामधील संघातील (Joint Venture) सदस्यांविरुध्द भादंवी कलम 463,465, 468. 417,420 सह 511,120 (ब), 34 अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोउपनि रोहीत गांगुर्डे यांनी सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.

Back to top button
error: Content is protected !!