राजकारण
Trending

निवडणूक आयोगाने आज शेण खाल्लेच, थोतांड सुरु ! धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही, चोरी पचली तरी चोर चोरच असतो: उद्धव ठाकरे

मातोश्रीवर भरगच्च पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची शिंदे गट, भाजपावर सडकून टीका

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२३ – आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणूक आयोग गडबड करणार आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर नितांत विश्वास आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष आहे. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणूक आयोगाचे थोतांड सुरु आहे. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने दाखल केले. तरीही निवडणूक आयोगाने आज शेण खाल्लेच. धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला ते मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो अशी टीका पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आज केली.

खरी शिवसेना कोणाची यावर आज सायंकाळी निवडणूक आयोगाने अंतिम निकालपत्र दिले. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भरगच्च पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट, भाजपा, केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काय बोलायचे हा देशातला मोठा प्रश्न आहे. निवडणुक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षांत आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता लाल किल्ल्यावरून जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. सहा महिने न्यायालयात लढाई सुरु तो पर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असे मी यापूर्वीही बोललो होतो. जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. निवडणुका घेण्याचे आव्हान मी केलेले आहे. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर आता मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच आहे. कागदावरचा धनुष्यबाण ते चोरू शकतात पण बाळासाहेबांचा मूळ धनुष्यबाण माझ्याकडेच राहणार आणि यापुढेही देव्हार्यात त्याची पूजा करत राहणार, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणूक आयोग गडबड करणार आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर नितांत विश्वास आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष आहे. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणूक आयोगाचे थोतांड सुरु आहे. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने दाखल केले. तरीही निवडणूक आयोगाने आज शेण खाल्लेच. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केले? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. उद्या त्यांनी नमाज पढले तरी ते हिंदू का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर उपस्थित केला.

बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणूक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही. आता बाळासाहेब चोरले. तुम्ही पोटनिवडणूक का नाही लढले. लोकशाही सक्षम व्हावी तर सर्वच क्षेत्रांनी एकत्र यायलाच हवे. आज माध्यमांवर पण धाडी पडताहेत. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत तेव्हाच निवडणुक आयोगाने निकाल दिला. ते म्हणतात काँग्रेसने तेव्हा तसेच केले, पण म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिले. देशाचे न्यायालय ही शेवटची आशा आहे. निवडणुक आयुक्तांच्या विरोधात प्रशांत भू़षण यांनी केस दाखल केलीय. पंतप्रधानांनी दखल घेतली असती तर लोकशाही विरोधात कृत्य झाले नसते. शिवसेना आता जोमाने पुढे येणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

अंधेरी पोटनिवडणुक झाली तेव्हा पण आमच्याकडे धनुष्यबाण नव्हते पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते मिळाली. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील, ह्याची सर्वांनी नोंद ठेवावी. लोकशाही संपतांना आपण गुपचूप बसणार आहोत का?  इंदिरा गांधींना पण जनतेने नाकारले होते आणीबाणी लावली म्हणून. यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजपाला बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

पाच न्यायमूर्ती निकाल देणार असतील तर आमचा आक्षेप नाहीच. ते निष्पक्षपणे सुनावणी घेताहेत. जे शिवसैनिक भेटतात त्यांना मी हेच सांगितले आपण १९६६ सालात आहोत. आपण देण्याचे काम केले आहे. निवडणुकांसाठीच निवडणुक आयोगाने ठरवून निकाल दिला. ज्यांनी गद्दारांना नेता बनवले ते माझ्यासोबतच आहे. निवडणूक प्रक्रिया कशी पार पडली त्याच्या सीडी इत्यादी सगळच निवडणूक आयोगाला दिले. सदस्य संख्या, पदाधिकारी आमच्या बाजूने आहे. आम्ही त्यांना भारी पडलो आहोत. आम्ही निवडणुक आयोगाला घरची रद्दी नाही दिली, असा संतापही ठाकरे यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने हलकटपणा सुरु आहे तसे कदाचित ते मशाल पण काढून घेऊ शकतात. आज तुमच्या माध्यमातून तातडीने मी शिवसैनिक आणि जनतेसमोर आलो, असेही ते म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!