छत्रपती संभाजीनगर
Trending

दारूने खचाखच भरलेला ट्रक चालकाने पळवला ! तब्बल ६० लाखांचे ९५० दारूचे बॉक्स ट्रक चालक मालकाने केले लंपास !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- छत्रपती संभाजीनगर MIDC चिकलठाणा येथून दारूने खचाखच भरून पुण्याला निघालेला ट्रक चालकाने परस्पर पळवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ट्रक मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. ट्रकमध्ये दारूचे एकूण 950 बॉक्स (ज्याची किंमत रुपये 59,11,353/-) असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

राजेंद्र नथुलाल विजयवर्गीय (वय 64 वर्षे धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय रा. टिळकनगर, छत्रपती संभाजीनगर) हे वेन्स कारगो मुव्हर्स प्रायव्हेट लिमीटेड (वर्धमान चैंबर जुना मोंढा छत्रपती संभाजीनगर) चा व्यवसाय करतात. ट्रान्सपोर्टच्या मार्फत संपूर्ण भारत देशात मालाची पोहोच करत आसतात. दि. 09/08/2023 रोजी ट्रन्सपोर्टच्या मार्फतीने व युनाईटेड स्प्रिट्स लिमीटेड चिकलठाणा यांचे वतीने एक ट्रक माल भरून पुण्याला पाठवण्यात आला. युनायटेड स्पिरीट लिमिटेड MIDC चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथून हा ट्रक पाठवण्यात आला.

युनायटेड स्पीरीट लि. कंपणीतून दारूचे विविध प्रकारचे बॉक्स एकूण 950 बॉक्स (ज्याची किंमत रुपये 59,11,353/-) ट्रकमध्ये लोड करून दिनांक 09/08/2023 रोजी रात्री 06.00 वाजेच्या सुमारास कंपनीतून वाळवेकर सन्स नाथ वेअरहाउसींग कंपनी फुरसुंगी पुणेला जाण्यासाठी रवाना झाला. त्या ट्रकवर चालक नामे अक्षय प्रकाश सकत (वय 23 वर्षे, रा. पिंपळ गाव खुड़े जि. अहमदनगर) होता व तो ट्रक किशोर मारुती पडदुणे (रा. बजाज नगर MIDC वाळूज छत्रपती संभाजीनगर) यांच्या मालकीचा असल्याचे समजले.

दि 10/08/2023 रोजी दुपारी 12.30वाजेच्या सुमारास वाळवेकर सन्स नाथ वेअरहाउसींग कंपनी फुरसुंगी पुणे यांनी राजेंद्र नथुलाल विजयवर्गीय यांना फोन करून कळविले की, MIDC चिकललठाणा कंपनीतून दारूचे 950 बॉक्स लोड केलेला ट्रक अद्याप पुणे येथे पोहचला नाही. त्यामुळे राजेंद्र नथुलाल विजयवर्गीय यांनी ट्रक ड्रायव्हरला फोन केला असता त्याने कळविले की माझे नातेवाईक आजारी असल्याने मी अहमदनगर येथे ट्रक घेवून आलो आहे.

ही माहिती सजताच राजेंद्र नथुलाल विजयवर्गीय यांनी ट्रक मालक किशोर मारुती पडदुणे यास फोन करुन ट्रक बाबत विचारले असता त्यांने कळवले की ट्रक ड्रायव्हर यांचा नातेवाईक आजारी असल्याने ड्रायव्हर हा मालाने भरलेला ट्रक घेवून अहमदनगर येथे थाबलेला आहे. दरम्यान, राजेंद्र नथुलाल विजयवर्गीय यांनी त्यांच्या ट्रान्सपोर्ट एजंटला खातरजमा करण्यासाठी अहमदनगर येथे पाठवले. मात्र, तो ट्रक तेथे दिसून आला नाही. त्यानंतर पुन्हा पुण्यात चौकशी केली असता तो ट्रक तेथेही पोहोचला नव्हता.

याप्रकरणी राजेंद्र नथुलाल विजयवर्गीय (वय 64 वर्षे धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय रा. टिळकनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून MIDC सिडको पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालक 1) अक्षय प्रकाश सकत 2) ट्रक मालक किशोर मारुती पडदुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!