पैठण तालुक्यातील पिंपळवाडीत (पिराची) महावितरणच्या पथकाची छापेमारी ! गावातील १३ जणांची बिनधास्त आकडे टाकून वीजचोरी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – महावितरणच्या पैठण शाखेच्या पथकाने मौजे पिंपळवाडी (पिराची) येथे छापेमारी टाकून तब्बल १३ जणांना वीज चोरी करताना रंगेहात पकडले. महावितरणच्या पोलवरून बिनधास्त आकडा टाकून वीज चोरी सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने आकड्याचे केबल जप्त केले असून त्या १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक अभियंता नागनाथ गोविंदआप्पा शंकरवार (म. रा. वि. वि. कंपनी, पैठण उपविभागाअंतर्गत, शाखा पैठण ग्रामीण) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, मौजे पिंपाळवाडी (पिराची), ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथे आकडे टाकून वीज चोरी करणारा विरुद्ध वीज चोरी पकडण्यासाठी कार्यवाही करण्यात आली.
पंच आणि सहकारी गणेश कडुबा मोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ इस्सारवाडी व संतोष सांडू भवरे, तंत्रज्ञ वाहेगांव यांच्या सोबत मौजे पिंपळवाडी (पिराची) ता. पैठण येथे हे पथक गेले असता त्या ठिकाणी गावातील अनेक जण त्यांच्या घरा जवळील, महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर वायरच्या सहाय्याने आकडे टाकून घरगुती वापरासाठी चोरून वीज वापर करताना आढळून आले. त्यांनी वीज चोरी साठी वापरलेल्या सर्व केबल (प्रत्येकी अंदाजे 60 ते 100 फुट) जप्त करून पैठण ग्रामीण शाखा कार्यालयात जमा केले. वीज चोरीमुळे महावितरण कंपनीचे अर्थिक नुकसान झालेले आहे.
1) नासिर बंडू शेख, 2) गजानन चंद्रभान खंडूरे, 3) साहेबराव पुंजाजी चबुकस्वार, 4) महिला आरोपी, 5) यूसुफ दगडू पठाण, 6) शेख समद शेख हुसेन, 7) महिला आरोपी 8) महिला आरोपी, 9) कारभारी अजित हमदभाई 10) सरदार उस्मान शेख, 11) बाबूराव महादेव चाबूकस्वार, 12) अनिल सर्जेराव लांडगे, 13) रमेश दादा शाहराव अशी आरोपींची नावे आहेत. यांनी महावितरण कंपनीचे एकूण 93,925/- रुपयांचे नुकसान केल्याचे पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe