छत्रपती संभाजीनगर दि.२५ – कौशल्य ,रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने गंगापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा बुधवारी (दि.२४) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ३०८ उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी १३७ उमेदवारांची प्राथमिक तर ६७ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस. आर. वराडे यांनी दिली आहे.
कौशल्य ,रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने गंगापूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा बुधवारी (दि.२४) शिवकृपा मंगल कार्यालय, वैजापूर रोड, तहसिल कार्यालया समोर, गंगापूर येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन तहसिलदार आकाश दहादडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आय टी आय गंगापूरचे प्राचार्य एस.पी. नागरे होते. नागरे यांनी शासनाच्या कौशल्य विकासासाठीच्या विविध योजनांचा लेखा जोखा मांडला.
मेळाव्यात डॉ.अनिल जाधव, लेखाधिकारी शरद भिंगारे, योगेश जोशी यांनी मार्गदर्शन करून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली व रोजगार संधीचा बेरोजगार तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
मेळाव्यात नवभारत फर्टिलायजर्स, बेलराईज इंडस्ट्री लि., मेटलमन ऑटो प्रा.लि., वेलंगी कनेक्टीव्हीटी प्रा.लि.,रॅन्डस्टंड इंडिया लि., कनेक्ट बिजनेस सोल्युशन, अजित सिड्स प्रा.लि. ओम साई प्रा.लि. कॅनपॅक इंडिया प्रा.लि. सिडलर इलेक्ट्रॉनिक, एन आर बी बेअरींग, धनंजय ग्रुप, आय बी एम ऑटो, श्री.गणेश प्रेस, एल आय सी ऑफ इंडिया, थिंक ॲण्ड लर्न प्रा.लि. इ. नियोक्त्यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उपस्थित ३०८ उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी १३७ उमेदवारांची प्राथमिक तर ६७ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe