छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

हडकोतील अतिक्रमणांवर जेसीबी फिरवला ! एम २, एन ९, स्वामी विवेकानंद नगर, एन १२ ते डी मार्ट रस्त्यावर कारवाईचा बडगा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने आज हडको भागात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. हडको येथील एम २, एन ९ या भागांत एकूण सात कंपाउंड वॉल पाडण्यात आले व रस्त्यावरचे एकूण ६ ओटे काढण्यात आले.

आज पूर्णपणे या रस्त्यावरची अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये विशेष करून चार चाकी वाहने बसेस यांच्यावर कारवाई करण्यात आली. स्वामी विवेकानंद नगर, एन १२ ते डी मार्ट या रस्त्यावर काही वाहन चालक हे त्यांच्याकडे जागा नसल्याने चक्क रस्त्यावर वाहने उभी करतात. या वाहनाच्या आडून काही नागरिक कचरा टाकतात तर खुलेआम दारू पिण्याचे प्रकार होतात. या भागातील महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना या भागातील टवाळखोर नेहमी त्रास देत होते.

म्हणून या वाहनधारकांना वेळोवेळी महानगरपालिकेच्या वतीने सूचना दिल्या होत्या. वार्ड अधिकारी मार्फत कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर वाहन चालक हे कोणालाही जुमानत नसल्याने आज शहर वाहतूक पोलीस शाखा यांच्या सहकार्याने एकूण चार बसेसवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून वीस हजार रुपये रोखीने दंड वसूल केला.

तसेच आज टीव्ही सेंटर परिसरातील दुकानासमोर असलेले शेड आणि बांधकाम काढणे बाबत आज सूचना देण्यात आली. शुक्रवारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त -२ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निषेधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे ,इमारत निरीक्षक सय्यद जमशेद ,रामेश्वर सुरासे व यांत्रिकी विभागाचे कर्मचारी त्यांची वाहने व अतिक्रमण विभागातील मजूर जेसीबी चालक यांनी कारवाई सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!