छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

पाचशे रुपयांच्या बनावट नोटाच्या रॅकेटचा पर्दाफाश ! पाचोड बायपासला पकडलेल्या आरोपीचे जालना शहागड कनेक्शन !!

बनावट नोटा जवळ बाळगून त्याची विक्री करून व्यहारात आणणाऱ्या टोळीची पाचोड पोलिसांकडून उकल ।

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – पाचशे रुपयांच्या बनावट नोटाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पाचोड बायपासला पकडलेल्या आरोपीचे जालना शहागड कनेक्शन उघड झाले आहे. आरोपीच्या ताब्यातून 500/- दराच्या 44 बनावट नोटा, धारदार पाते असलेला सुरा, मोबाईल हॅन्डसेट, मोराती स्वीफ्ट कार असा एकूण 475500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुंदन सुधाकर जगताप (25 वर्षे रा. अंकुशनगर, महाकाळा ता. अंबड जि. जालना), सचिन मधुकर जाधव (रा. शहगड ता. अंबड जि.जालना) व आप्पासाहेब पवार (रा. शहागड) अशी आरोपींची नावे आहे. सुरुवातीला कुंदन पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर सचिन जाधवपर्यंत पोलिस पोहोचले.

दि. 6.11.2023 रोजी संध्याकाळी पोउपनि सुरेश अशोक माळी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक जण पाचोड येथे बनावट नोटा घेवून येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती सपोनि माने यांना दिली. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी सपोनि माने, पोना बर्डे यांच्यासह पोलिस पथक खाजगी वाहनाने पाचोड बायपास येथे रवाना झाले. गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपीचा शोध घेतला असता तो हॉटेल निसर्ग येथे जेवणासाठी थांबलेला असल्याची खात्री पटली. 21.30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी हॉटेल समोर एक स्वीफ्ट कार थांबलेली दिसून आली.

त्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीस खाली उतरवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुंदन सुधाकर जगताप (25 वर्षे रा. अंकुशनगर, महाकाळा ता. अंबड जि. जालना) असल्याचे सांगितले. त्याची दोन पंचासमक्ष पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या जर्कीनच्या खिशामध्ये 500 रुपये दराच्या 13 नोटा मिळून आल्या व नोटाचे लाईटच्या उजेडामध्ये बारकाईने निरीक्षण केले असता त्या बनावट असल्याचे व काही नोटांचा क्रमांक एक सारखा असल्याचे दिसून आले.

त्यावरून सदरच्या नोटा या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी कुंदन जगताप याला विश्वासात घेवून बनावट नोटा कोणाकडून आणल्या याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरच्या बनावट नोटा या त्याचा मित्र सचिन मधुकर जाधव (रा. शहगड ता. अंबड जि.जालना) याच्याकडून पाच हजार रुपयामध्ये विकत घेतल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिस पथकाने शहागड येथे जावून सचिन मधुकर जाधव (वय 27 वर्षे रा. शहागड) याचा शोध घेवून त्याच्या घरुन त्याला ताब्यात घेतले.

त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये बाळगलेल्या एकूण 31 बनावट नोटा आरोपी सचिन मधुकर जाधव याच्या अंगझडतीमध्ये मिळून आल्या. आरोपी सचिन जाधव याच्या घराची झडती घेतली व त्याला विश्वासात घेवून बनावट नोटा कोणाकडून आणल्या याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरच्या बनावट नोटा या त्याचा मित्र आप्पासाहेब पवार (रा. शहागड) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यावरुन त्याच्या घरी जावून त्याचा शोध घेतला असता आप्पासाहेब पवार हा मिळून आला नाही.

तरी दि.6.11.2023 रोजी 21.30 वाजेच्या सुमारास यातील आरोपी कुंदन सुधाकर जगताप (रा. अंकुश नगर, महाकाळा ता. अंबड जि.जालना) याने त्याच्याकडील नोटा बनावट असल्याचे माहिती असताना त्याने यातील आरोपी सचिन जाधव याच्याकडून पाच हजार रुपयामध्ये विकत घेवून खऱ्या म्हणून वापरण्याच्या उद्येशाने जवळ बाळगल्या व आरोपी सचिन मधुकर जाधव (रा. शहागड) याने त्याच्या ताब्यातील बनावट पाचशेच्या नोटा आरोपी कुंदन जगताप याला विक्री केल्या व आरोपी आप्पासाहेब पवार (रा. शहागड) याच्याकडून बनावट पाचशे रुपयाच्या घेवून नोटा खऱ्या म्हणून वापरण्याच्या उद्येशाने जवळ बाळगल्याने त्यांच्या विरुध्द भादवि कलम 489 ब, 489 क, 34 सह कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी यांच्या ताब्यातून 500/- दराच्या 44 बनावट नोटा, धारदार पाते असलेला सुरा, मोबाईल हॅन्डसेट, मोराती स्वीफ्ट कार असा एकूण 475500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे पाचोड करीत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.डी.माने, पोउपनि सुरेस माळी, पोह अभिजित सोनवणे, पोना पवन चव्हाण, पोना फिरोज बरडे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!