छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

व्हेरॉक कंपनीचे काम देतो अशी थाप मारून 30 हजार उकळले !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – व्हेरॉक कंपनीचे काम देतो म्हणून ३० हजार घेवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कामाचे कोटेशन ईमेल केले. त्यानंतर फोन पे वर ३० हजार दिले मात्र, काम काही दिले नाही.

सचिन अशोक निकम असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात सुधाकर मदनराव मंदाडे (वय ५२, रा. सारा वृंदावन, दिडको बाळूज महानगर, ता. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सचिन याने मंदाडे यांना कामाच्या संदर्भाने मेल आयडीवर ड्राईंग टाकले. सदर ड्राईंग वरुन मंदाडे यांच्या कामाचे कोटेशन दिले.

कोटेशन दिल्यानंतर सचिन निकम यास त्याच्या फोन पे वर तीस हजार रुपये दिले. त्यानंतर मंदाडे यांनी सचिन यास वेळोवेळी फोन करून कामाबाबत विचारपुस केली. परंतु त्याने मंदाडे यांना व्हरेक कंपनीचे काम दिले नाही. त्यामुळे मंदाडे यांनी त्या कंपनीचे प्रकाश गुंजाळ यांना समक्ष भेटून सचिन निकम याने काम न दिल्याबाबत तक्रार दिली.

त्यावरून प्रकाश गुंजाळ यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना ही माहिती दिली. त्यानंतर सचिन याची कंपनीच्या प्रशासनाने चौकशी केली. तसेच त्याने चुक कबुल करून कंपनीला लेखी आश्वसन देऊन लोकांकडून घेतलेले पैसे परत करतो असे सांगितले आहे. त्यानंतरही मंदाडे यांनी त्यास वेळोवेळी फोन करून तीस हजार रुपये मागितले असता त्याने पैसे परत केलेले नाहीत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सुधाकर मदनराव मंदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन अशोक निकम याच्यावर एम वाळुज पोलिस स्टेशनमध्ये 536/2024 कलम 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह गिरी करत आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!