टॉप न्यूजपैठण
Trending

पैठण पिंपळवाडीच्या डॉक्टरवर चाकू काढला ! हॉर्न वाजवतोस का ? आमच्या अंगावर गाडी घालतोस का म्हणून मारहाण !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – हॉर्न वाजवतोस का ? आमच्या अंगावर गाडी घालतोस का म्हणून दोघांनी डॉक्टरला मारहाण केली. पैठण तालुक्यातील पिंपळवाडीच्या डॉक्टरला मारण्यासाठी चाकूही काढला.

सचिन भीमराव अवसरमोल वय (39 वर्ष व्यवसाय-डॉक्टर रा. पिंपळवाडी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर सचिन अवसरमोल यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून ते पिंपळवाडी येथील सरकारी दवाखाना येथे 3 वर्षांपासून डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

दि. 26/08/2024 रोजी 00.30 वाजेच्या सुमारास डॉक्टर सचिन अवसरमोल हे पिंपळवाडी येथून कार नं MH 20 CS 0023 ने पैठण माधवनगर येथील योगेश्वरी हॉस्पिटला जात होते. इंदीरानगर चौक येथे दोन मुले कुणाल पंचलोखंडे (रा. इंदीरानगर पैठण) त्याच्या सोबत एक अनोळखी मुलगा हे चौकाच्या मधोमद उभे होते. डॉक्टर सचिन अवसरमोल यांनी त्यांना हॉर्न वाजवला असता ते बाजुला न झाल्याने त्यांनी त्यांची कार साईडने घेत असताना कुणाल याने कारला दगड फेकून मारला.

त्यामुळे डॉक्टर सचिन अवसरमोल हे कारच्या खाली उतरले. दगड का मारला असे विचारले असता कुणाल पंचलोखंडे म्हणाला की तू आम्हाला हॉर्न वाजवतोस का आमच्या अंगावर गाडी घालतोस का असे म्हणुन शिवीगाळ करु लागला. थांब तुला दाखवतो असे म्हणून कुणाल पंचलोखंडे याने त्याच्या खिशातील चाकु काढला. चाकु पाहून डॉक्टर सचिन अवसरमोल हे मागे पळाले तेव्हा कुणाल पंचलोखंडे याने त्यांना दगड फेकुन मारू डाव्या हाताच्या मनगटावर दुखापत केली. शिवीगाळ करत चापटबुक्याने मारहाण केली व जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी डॉक्टर सचिन अवसरमोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैठण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!