झेडपी
Trending

जालन्याचे भूमीपूत्र मधुकरराजे आर्दड विभागीय आयुक्तपदी रुजू ! मराठवाड्याला मिळाला धडाकेबाज अधिकारी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ : सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर रिक्त झालेल्या विभागीय आयुक्त पदावर जालना जिल्ह्याचे भूमीपूत्र मधुकरराजे आर्दड यांच्या नियुक्तीचे पत्र धडकले आणि आजच त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला. आर्दड यांच्या रुपाने मराठवाड्याला धडाकेबाज अधिकारी मिळाले असून विविध विकासकामांना वेग देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विभागीय आयुक्त हे पद रिक्त होते. जवळपास १४ दिवस विभागीय आयुक्त हे पद प्रभारी होते. दरम्यान, आज, १७ जुलै रोजी शासनाने मधुकरराजे आर्दड यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. आदेश मिळताच मधुकरराजे आर्दड यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला.

जालन्याचे भूमीपूत्र, विविध पदांना न्याय- मधुकरराजे आर्दड हे राजाटाकळी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील रहिवासी आहेत. मधुकरराजे आर्दड यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विविध पदांवर काम केले आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मुंबई, कल्याण डोंबिवली आदी ठिकाणी त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सिईओ, सिडकोचे प्रशासक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

Back to top button
error: Content is protected !!