गंगापूरछत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडली, गंगापूर तालुक्यात चोरट्यांनी डोके वर काढले !

गंगापूर तालुक्यातील राजुरा शिवारात चोरी

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० :- गंगापूर तालुक्यात चोरट्यांनी डोके वर काढले असून खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली. तसेच एका ठिकाणीही चोरी झाली. गंगापूर तालुक्यातील राजुरा शिवार गट क्रमांक ६२ मध्ये चोरीचा हा प्रकार घडला.

1) 10,000/- रुपये किंमतीची जुनी वापरती सोन्याची पोत ज्याचे वजन 02 ग्राम वजनाची. 2) 25,000/- रुपये किंमतीचे जुने मणी मंगळसूत्र ज्याचे वजन ०५ ग्राम वजनाचे. 3) 900/- रुपये किंमतीचे जुने वापरते पायातील चांदीचे जोडवे. 4) 900/- रुपये किंमतीचे जुने वापरते पायातील चांदीचे 03 भार वजनाचे चैन. एकूण:-36,800/- रुपये. तसेच 5) खंडोबा मंदिराचे पुजारी कैलास रुस्तुम जाधव, राहणार राजुरा, ता. गंगापूर, जि छत्रपती संभाजीनगर यांनी कळवले की, खंडोबा मंदिराच्या आवारातील दानपेटी उचकाटून त्यातीन अंदाजे 5000/- रुपये चोरुन नेले आहे.

वरील वर्णानाचे सोन्या चांदीचे दागिने व खंडोबा मंदिरातीव रोख रक्कम अज्ञात चोरट्याने खिडकी उघडी करून बांबुच्या सह्याने घरातील खुंटीला लटकवलेली पर्स बाहेर काढून त्यातील दागिने चोरुन नेले आहे. सोन्या चांदीचे दागिने व खंडोबा मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्या विरुध्द तक्रार देण्यात आली आहे.

एकूण 41,800/- रुपये चोरीस गेल्याची तक्रार शाईनाथ भिकाजी जाधव (रा. राजुरा शिवार, गट नंबर ६२, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी वाळूज पोलिस ठाण्यात दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!