छत्रपती संभाजीनगर
Trending

हर्सूल ग्रामीण शाखेतील पिसादेवी, आडगाव, पोखरी व मांडकीत महावितरणची छापेमारी ! वीजचोरी करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल, आजूबाजूच्या गावांतही लवकरच धडकणार पथक !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ : महावितरणच्या हर्सूल ग्रामीण शाखेने अडीच लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून शुक्रवारी बारा जणांवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हर्सूल शाखेने गेल्या तीन महिन्यांत विविध गावांत घरगुती व व्यावसायिक वापरासाठी विद्युत वाहिनीवर आकडे टाकून २ लाख ५२ हजार ७३६ रुपयांची चोरी झाल्याचे उघड केले होते. हर्सूल शाखेचे सहाय्यक अभियंता शेख फेरोज, कर्मचारी अनिल कांबळे, सुरेश बरवे, रवी चाथे, संदीप सोनवणे, प्रवीण बोराडे, विठ्ठल धायगुडे, शेख अजीम, शेजवळ, पटेकर आणि पंकज पाटील यांनी या मोहिमेत भाग घेतला.

या प्रकरणी पिसादेवी, आडगाव, पोखरी व मांडकी या गावांतील अंजली प्रकाश जाधव, दादाराव कृष्णा पठाडे, लक्ष्मण उखंडे, चेअरमन शकुंतला पार्क सोसायटी, रत्नाकर म्हस्के, आसाराम सांडू पळसकर, सतीश देवराव पठाडे, कडुबा काशिनाथ पठाडे, दादाराव केशव पठाडे, विठ्ठल जगन्नाथ पठाडे, विकास रघुनाथ रिठेव रामभाऊ अश्रुबा चौथे यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम कायद्याच्या कलम १३५ अन्वये चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक अभियंता शेख यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक आर.पी. खांडेकर करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!