पुरोहिताने सांगितले मुलामध्ये मंगळ ग्रह असून संसार चांगला होणार नाही ! सासरच्या लोकांनी विवाहितेला घराबाहेर हाकलले, पुरोगामी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – पुरोहिताने सांगितले मुलामध्ये मंगळ ग्रह असून संसार होणार नाही. यासह अन्य कारणांनी विवाहितेचा छळ करून सासरच्या लोकांनी विवाहितेला घराबाहेर हाकलले. पुरोगामी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील या संतापजनक प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. चारीत्र्यावर संशय, आई वडीलांकडून कार घेण्यासाठी २० लाख रुपये घेवुन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे विवाहितेने फिर्यादीत नमूद केले आहे.
यासंदर्भात पीडित विवाहितेने ( रा. काळेवाडी पुणे, ह.मु गेवराई, ता. गेवराई जि. बीड) दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार गेवराई येथील बेद्रे लॉन्समध्ये लग्न झाले. लग्नामध्ये विवाहितेच्या आई वडीलानी पती व सासु सासरे यांना मान पान देवून हुंड्यापोटी आकरा लाख रुपये व आकरा तोळे सोने दिले होते. लग्ना नंतर सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी एक ते दीड महिने चांगले सांभाळले. त्या नंतर घरातील काही छोट्या छोट्या गोष्टीच्या कारणा वरून विवाहितेला त्रास दिला.
1) संदीप बंडु राठोड पती 2 ) बंडु गणपत राठोड सासरा 3) सासू ) प्रशांत बंडु राठोड – दीर 5) जाऊ (रा. गजानन कॉलनी ज्योतीबा नगर काळेवाडी पुणे), (6) देवराव नामदेव राठोड मावस सासरा 7) देवराव नामदेव राठोड यांची पत्नी 8) गजानन देवराव राठोड मावस दिर 9) मावस जाऊ (रा. लोहा ता. लोहा जि.नांदेड) हे सर्व जण मिळून जाच करू लागले.
पती संदीप यांना ते म्हणू लागले की तू तुझ्या बायकोला सोडून दे आपण तुझे दुसरे लग्न करु. तुला खुप मोठा हुंडा येईल. तसेच त्यांना ब्राम्हण जोशी पुरोहीत यांनी सांगितले की मुलामध्ये मंगळ ग्रह आहे. त्यामुळे त्याचे व पत्नीचे संसार होणार नाही असे सांगितल्याने विवाहितेच्या सासरचे लोक पतीच्या मनामध्ये गैर समज निर्माण करु लागले. त्यावरुन पती संदीप जास्त त्रास देवून कधी मधी मारहाण करु लागले. नवीन कार घ्यायची आहे. त्यासाठी तू आई वडीलाकडून २० लाख रुपये घेवून ये असे म्हणून त्रास देऊ लागले. तसेच सासरला असलेला नातेवाईक बटाईदार वामन ग्यानु चव्हाण (रा. रुई ता. अहमदपूर जि.लातूर) हा हाही गैर समज निर्माण करुन विवाहितेला टोमणे मारून बोलत असे.
दरम्यान, सासरी नांदत विवाहितेला पती संदीप, सासु, दीर-प्रशांत यांनी मारहाण करून घरा बाहेर हाकलून दिले. त्यानंतर घरामध्ये येऊ दिले नाही व घराला दुसरे कुलुप लावल्याने विवाहितेने वाकड पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात सासरच्या १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe