सोलार प्लेट्स चोरणारे चार चोरटे शिऊर पोलिसांच्या जाळ्यात ! वैजापूर, फुलंब्री, संभाजीनगरच्या टोळीकडून पाचोड, घनसावंगीतही चोरीची कबुली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – सोलार प्लेट्स चोरणारे चार चोरटे शिऊर पोलीसांच्या जाळयात अडकले. हे चोरटे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर आणि फुलंब्री तालुक्यातील असून त्यांनी आतापर्यंत जरुळ, खंडाळा, शिऊर हद्द, पाचोड, घनसावंगी (जि. जालना) आदी ठिकाणीही चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीस स्टेशन शिऊर हद्दीतून विविध ठिकाणाहून एकूण 874,000 /- रुपये किमतीचा मुददेमाल या चोरट्यांकडून जप्त करण्यात आला आहे.
1 ) लक्ष्मन भास्कर निकम (वय 35 वर्षे रा. अंचलगाव ता. वैजापूर), रामकृष्ण दत्तु पवार (वय 32 वर्षे रा. छ. संभाजीनगर), 3) उद्धव प्रकाश भिवसने (रा.बाबरा ता. फुलंब्री) व 4) गणेश राजपुत (छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस स्टेशन शिऊर येथे दि. 03/05/2023 रोजी फिर्यादी गणेश नंदु कदम (रा. निपानी ता. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. तसेच दि.06/03/2023 रोजी फिर्यादी बबन वामनराव जाधव (रा.शिवुर ता. वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असून, सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सौरप्लेटांचा शोध घेत असतांना तांत्रीक विश्लेशनाव्दारे व गुप्त बातमीदारामार्फतीने माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील संशयित 1 ) लक्ष्मन भास्कर निकम (वय 35 वर्षे रा. अंचलगाव ता. वैजापूर), रामकृष्ण दत्तु पवार (वय 32 वर्षे रा. छत्रपती संभाजीनगर) यास विश्वासात घेवून विचारपूस केली. सदर गुन्हा हा 3) उद्धव प्रकाश भिवसने (रा.बाबरा ता. फुलंब्री) व 4) गणेश राजपुत (छत्रपती संभाजीनगर) यांनी मिळून केला असल्याची कबुली दिली.
त्यांना सदर गुन्ह्यात अटक करुन त्यांना अधिक विचारपुस केली असता त्यांनी या आधि पोस्टे शिवूर हद्दीत 1 ) जरुळ, 2) खंडाळा, पोस्टे शिवुर हद्दीत पोस्टे पाचोड, घनसावंगी जि. जालना अशा विविध ठिकाणी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीतांकडुन इस्कॉन टाटा कंपनीच्या 37 सौरप्लेटा किंमत अंदाजे 314000 रुपये किंमतीच्या गुन्ह्यात वापरलेले एक पिकअप 400000/- रुपये किंमतीचे व 1 ) होंडा शाईन मोटारसायकल 80000/- रुपये किंमतीची असा एकूण 874,000 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीतांच्या ताब्यातुन जप्त केला आहे.
ही कामगीरी पोलीस अधिक्षक मनिष कलवानीया, अप्पर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवर, सहायक पोलीस अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पाटील, पोउपनि अंकुश नागटिळक, पोउपनि योगेश पवार, सफौ भिकन शेख, टिलोकचंद पवार, सफौ रामचंद जाधव, पोलीस हवालदार विशाल पडळकर, मपोना सविता वरपे, मपोना शिकेतोड, पोकों विशाल पैठणकर, पोकों संभाजी आंधळे, पोकों गणेश जाधव, मपोकॉ श्रद्धा शेळके यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe