कन्नडछत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

शिवूर पोलिसांकडून मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद ! देवगाव रंगारी, मनूर, घाणेगावचे चोरटे गजाआड !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, १७- शिवूर पोलिसांनी मोटारसायकल चोरटयांना जेरबंद केले. त्यांचेकडून चोरीचा 4,55,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यात 16 मोटार सायकलचा समावेश आहे असा जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणा-यांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याबाबतच्या सूचना वरिष्ठांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत. यावरून वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी सहा. पोलीस अधिक्षक यांनी अशा गुन्हयांचा जलद गतीने तपास करण्याबाबत मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणून अशा घटनांना आळा बसणे कामी मार्गदर्शन केले.

यावरून पोलीस ठाणे शिवूर येथील प्रभारी अधिकारी सपोनी संदीप पाटील हे त्यांच्या पथकासह, शिवूर परिसरातील मोटार सायकल चोरी करणा-या गुन्हेगारांची तसेच शिवूर हददीत चोरी गेलेल्या मोटारसायकल बाबत माहिती घेत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देवगाव रंगारी येथे राहणारा आसिफ शेख मुकीत (रा. देवगाव रंगारी कुमार गल्ली ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) हा अशा प्रकारची चोरी करतो. त्याच्याकडे चोरीच्या गाड्या ठेवलेल्या आहेत, या माहितीवरून सपोनी संदीप पाटील व त्यांच्या पथकाने संशयितांचा कसोशीने शोध घेवून शिताफिने त्यास देवगाव रंगारी येथील त्याच्या गॅरेजमधून ताब्यात घेतले.

त्यास विश्वासात घेवून गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस करता तो सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तरे पोलिसांना देवू लागला. यावरुन त्याच्यावर अधिक संशय बळावल्याने त्याची कसून चौकशी करता त्याने त्याचा साथीदर 1) अजय बाळु चव्हाण (रा. मनुर ता. वैजापूर), 2) पारस अशोक पुरे (रा. देवगाव रंगारी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर), 4) विजय राजु अभंग (रा. मनुर ता. वैजापूर), 5) संदेश अत्तम खिल्लारे (रा. एमआयडीसी घाणेगाव, ता. गंगापूर) यांच्या सोबत मिळून चोरी केल्याचे कबुल केले.

आरोपींनी मिळून छत्रपती संभाजीनगर शहर, मनुर, देवगाव रंगारी करुडी फाटा, धोदलगाव, राजनगांव एमआयडीसी, कसाबखेडा परीसरातून एकूण 16 मोटारसायकल चोरी केलेल्या जवळपास 4,55,000/- रुपये किमतीचा लपवून ठेवलेला पोलिसांना काढुन दिला. यावरुन १) आसीफ शेख मुकीत रा. देवगाव रंगारी कुंभार गल्लनी, कोतवाल गल्ली ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर 2) अजय बाळु चव्हाण रा. मनुर ता. वैजापूर 3) पारस अशोक पुरे रा. देवगाव रंगारी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर 4) विजय राजु अभंग रा. मनुर ता. वैजापूर 5) संदेश उत्तम खिल्लारे रा. एमआयडीसी घाणेगाव ता. गंगापूर यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास शिवूर पोलिस करीत आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया पोलीस अधिक्षक, सुनिल लांजेवार अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी सहा पोलीस अधिक्षक, वैजापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पाटील, पो.उप.नि अंकुश नागटिळक, योगेश पवार, सफी आर. आर. जाधव, टि.पी. पवार, पोलीस अमलदार, अविनाश भास्कर, विशाल पडळकर, सुभाष टोक, सविता वरपे, गणेश जाधव, विशाल पैठणकर, सिध्देश्वर इधाटे, शेळके यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!