महाराष्ट्र
Trending

पैठण, गेवराईचे मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात ! गेवराई पोलिसांची वडगाव ढोक तांड्यावर छापेमारी, दोन दुचाकी हस्तगत !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक तांड्यावर छापा मारून दोन मोटारसायकलीसह दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या असून त्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस हवालदार सुंदर नामदेव राठोड (पोलीस ठाणे गेवराई, जि बीड) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 05/10/2023 रोजी पोउपनि थोटे, पोह राठोड, पोह पिंपळे पोलीस ठाणे येथे हजर असताना गुप्त बातमी मिळाली की, सुरेश बबन आडे (रा. वडगाव ढोक तांडा ता. गेवराई) याने चोरीच्या मोटारसायकल आणून ठेवलेल्या आहेत. ही खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलिस पथक खाजगी वाहनाने सदर ठिकाणी धडकले. वडगावढोक तांड्यातील सुरेश बबन आडे यांच्या राहते घरी 02.50 वाजता छापा मारला.

तेथे दोन जण मिळून आले. 1) सुरेश बबन आडे वय 25 वर्षे रा. वडगाव ढोक तांडा ता.गेवराई 2) गोकुळ रोहीदास राठोड वय 27 वर्षे रा. कडेठाण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली. तेथील घरातील अंगणात मोटार सायकलची पाहणी करता दोन होन्डा कंपनीची सि.बि. शाईन मोटार सायकल मिळून आल्या.

त्यावर पासींग नंबर नमुद केलेला नव्हता. पोलिसांनी कागदपत्राबाबत व मालकी हक्का बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे व असमाधानकारक उत्तरे दिली. त्यावरुन मिळून आलेल्या होन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल चोरीची असल्याची दाट शक्यता आल्याने दोघांना ताब्यात घेवून मोटार सायकलची पाहणी करून जप्ती पंचनामा करण्यात आला.

याप्रकरणी पोलिस हवालदार सुंदर नामदेव राठोड (पोलीस ठाणे गेवराई, जि बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) सुरेश बबन आडे वय 25 वर्षे रा. वडगाव ढोक तांडा ता.गेवराई 2) गोकुळ रोहीदास राठोड वय 27 वर्षे रा. कडेठाण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर या दोघांवर गेवराई पोलिस स्टेसनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!