पोलिस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी, पात्र उमेदवारांची निवड यादी दहा दिवसांनी जाहीर करणार !
खेड तालुक्यातील पोलिस पाटील रिक्त पदांची भरती
पुणे, दि. 6: खेड तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी ३ जुलै २०२३ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. प्राप्त अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली होती. परंतु, या उपविभागातील नैसर्गिक आपत्ती व प्रशासकीय कारणास्तव सदर लेखी परीक्षेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली होती. आता याबाबत पुन:श्च कालबद्ध वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशपत्र खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातून प्राप्त होतील. लेखी परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरूनगर येथे होणार आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कागदपत्रांची पडताळणी व तोंडी मुलाखत १२ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस धरुन) सकाळी १०:३० पासून घेण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी १८ ऑक्टोबर रोजी सायं ६ वा. नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी सुधारित कालबद्ध कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe