महाराष्ट्र
Trending

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं अशक्य, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजनांच्या वक्तव्याने खळबळ !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं अशक्य असल्याचं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केल्याने मराठा समाजातून त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या उंचीचे सत्ताधारी मंत्रीच अशी वक्तव्य करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, मनोज जरांगे पाटलासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री हे दोघेही लक्ष घालत आहेत. मला वाटतं त्यासंदर्भात आधीच सांगितलं आहे की, त्यांची जी मागणी आहे सरसकट द्यावं. मी आधीही सांगितलं आहे. त्यांच्याकडे जाऊन बसलो चारवेळा त्यावेळीही सांगितलं की, सरसकट देणं हे कदापी शक्य नाही.

आता जेवढे आपल्याला कुणबी दाखले काढता आले तेवढे काढले आहे. तेवढ्या लोकांना आपण कुणबी प्रमाणपत्र देत आहोत. पण कुठल्या कायद्यानुसार देणार, कुठच्या नियमानुसार देणार ? हाही मोठा प्रश्न आहे, असेही ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना एकदम टोकाचे मत व्यक्त करून महाजन यांनी मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

Back to top button
error: Content is protected !!