सिल्लोड

लग्नाच्या आठ महिन्यांतच पती-पत्‍नीने गळ्याला अडकवला फास!; घटांब्री हादरले!!, सिल्लोडमध्ये एकच चर्चा का केले असेल असे?

सिल्लोड, दि. १२ ः पत्‍नीने राहत्‍या घरी तर पतीने नदीच्या पुलाखाली गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची दुर्दैवी घटना सिल्लोड तालुक्‍यातील घटांब्री येथे काल, ११ डिसेंबरला दुपारी समोर आली. आठ महिन्यांपूर्वीच त्‍यांचे लग्न झाले होते. टोकाचे पाऊल या दाम्‍पत्‍याने का उचलले असेल, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

विकास गणपत तायडे (२६) व सौ. सपना विकास तायडे (२१, दोघे रा. घटांब्री) अशी आत्‍महत्‍या केलेल्यांची नावे आहेत. विकास हा चिंचोली लिंबाजी येथे पोस्टमास्तर आहे. त्‍याचा विवाह एप्रिलमध्ये दहिगाव येथील सपनासोबत झाला होता. काही दिवसांपासून दोघे कुटुंबियांपासून वेगळी खोली करून राहत होते. सकाळी साडेअकराला सपनाने राहत्‍या घरात गळफास घेतला. विकास त्‍यावेळी सिल्लोडला मोटारसायकलची सर्व्हिसिंग करायला गेला होता.

पत्‍नीच्या आत्‍महत्‍येची माहिती मिळताच तो घटांब्रीकडे निघाला, पण गावात न येता अंभईजवळील बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली थांबून दुपारी १ च्या सुमारास गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. दोघांचे मृतदेह सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. रात्री दोघांवर घटांब्रीत अंत्‍यसंस्कार करण्यात आले.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

Back to top button
error: Content is protected !!