मुख्याध्यापकाला तीन हजारांची लाच घेताना पकडले ! रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य गेटसमोरच चतुर्भुज !!
छत्रपती संभाजीनगर – 12 वी पासचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक लाचेच्या सापळ्यात अलगद अडकला. दिनांक 07/06/2024 रोजी रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज चे मुख्य गेटसमोर ही कारवाई करण्यात आली.
धनराज सखाराम सोनवणे (वय -55 वर्षे, व्यवसाय नौकरी, मुख्याध्यापक, रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज ता. केज जि.बीड रा.सारणी आनंदगाव ता. केज जी.बीड (वर्ग -3)) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी 12 वी पासचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावरून 12 वी पास चा शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी आरोपी सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 3000/रू. लाचेची मागणी केली. लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून 3000/- रू. लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक, सापळा अधिकारी – युनूस शेख, पोलीस निरीक्षक ला. प्र. वि .बीड, पर्यवेक्षण अधिकारी – शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि .बीड, सापळा पथक:- सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, स्नेहलकुमार कोरडे ला. प्र. वि.बीड यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe