पैठण
Trending

बिडकीनच्या सरपंचपदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदे गटाला धूळ चारली, पालकमंत्री भुमरेंना मोठा झटका ! पैठण तालुक्यातील २२ गावांच्या सरपंचाची नावे घ्या जाणून !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – पैठण तालुक्यातील सर्वात मोठ्या बिडकीन ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सरपंचाने शिंदे गटाच्या उमेदवाराला धूळ चारली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या सरपंचाच्या निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारली. धर्मे अशोक भानुदास यांनी सरपंच पदी विजयाचा गुलाल उधळला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ७, राष्टवादीचे ५ शिंदे गटाचे ३ तर २ अपक्ष निवडून आले. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्या बिडकनच्या गावचा कारभार आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती आला आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय विजयी सरपंचाची नावे –

गेवराई बाशी- काकडे रमेश प्रल्हादराव

जांभळी – कळसकर शारदा बद्रीनाथ

सालवडगाव – चव्हाण सुनील भाऊराव

नारायणगाव – रोडे श्रद्धा योगेश

देवगाव – कोठुळे योगेश विक्रम

हिरापुर – राठोड विनोद बाबु

कुरणपिंप्री – शेख रुकसाना कठ्ठू

कृष्णापूर – दळवी जयश्री सुनिल

बिडकीन – धर्मे अशोक भानुदास

पोरगांव – नीळ संगिता प्रभू

चिंचाळा – कोळपकर अश्विनी अनिल

धुपखेडा – भालेकर मिरा भागचंद

तारुपिंपळवाडी – साठे लिलाबाई नाथा

नांदर – गायकवाड विजय मनोहर

टाकळी पैठण – गोरे पद्मा विजय

आडूळ – भावले बबन गोविंदराव

बोकूड जळगाव – तरमळे मिराबाई सुभाष

मुधलवाडी – मुकूटमल मनिषा भारत

दिनापुर – खणसे मथुरा भीमराव

वरवंडी – राठोड बबाबाई उत्तम

धनगाव – मावस संदीप विनायक

शेकटा – लता विष्णू भवर

Back to top button
error: Content is protected !!