हे राम..! इंदूरमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिरातील विहीरीचे छत कोसळून १२ भाविकांचा मृत्यू !!
इंदूर, दि. ३० – रामनवमीला इंदूरमध्ये मोठी दुर्घटना घडली. श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातील विहीरीवरचे छत कोसळल्याने काही भाविक त्यात पडले. या दुर्घटनेत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. इंदूरमधील पटेल नगर परिसरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात रामनवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. त्याचवेळी विहिरीवरील छत कोसळले आणि भाविक विहिरीत पडले.
आज संपूर्ण देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मदिरं भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. या उत्साहाच्या सनावर इंदूरमध्ये विरजन पडले. श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात घडलेल्या दूर्घटनेमुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विहिरीत पडलेल्या जखमी भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर विहीर 40 फूट खोल असून, त्यावर लोखंडी जाळी होती. लोखंडी जाळीवर स्लॅब टाकून हे बांधकाम करण्यात आले होते. या छतावर भाविकांची गर्दी उसळल्याने ही दूर्घटना घडून विरहीवरील छत कोसळले.
दुर्घटना घडताच स्थानिकांनी प्रशासनाला तातडीने माहिती दिली. माहिती मिळताच मदकार्य वेगाने सुरु झाले. मात्र अरुंद रस्त्यांमुळे बचावकार्यात अडचण येत होती. या अडचणीवर मात देवून प्रशासनाने १९ जणांना बाहेर काढले. सदर विहीरीवर हवन होत असल्याने तेथे गर्दी उसळते आणि केव्हाही दुर्घटना घडू शकते अशी तक्रार काही जणांनी यापूर्वीच केली होती मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe