सहायक नगररचनाकार दीड लाखाची लाच घेताना सापळ्यात ! तीन एकर शेतीच्या अकृषि प्रस्ताव मंजुरीसाठी “खाल्ली माती” !!
धाराशिव, दि. ३० – तीन एकर (१२० गुंठे) शेत जमीन अकृषी करण्यासाठीच्या प्रस्तावास तात्पुरती मंजुरी देण्यासाठी सहायक नगररचनाकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. दीड लाखाची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
मयुरेश माणिकराव केंद्रे (वय ३० वर्षे, सहायक नगररचनाकार, नगररचना कार्यालय, धाराशिव रा. सिध्देश्वर हाउसिंग सोसायटी, प्लॉट नं. २४, कालिका देवी मंदिराचे बाजुला, जुना औसा रोड, लातुर (खाते – नगरविकास, वर्ग -२) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदा यांचे मौजे शिंदफळ ता. तुळजापूर येथील शेत जमीन गट नं. १८७ मधील १२० गुंठे अकृषी या साठीचे प्रस्तावास तात्पुरती मुजुरी ( lay out tentative) देण्यासाठी यातील आरोपी सहायक नगररचनाकार मयुरेश माणिकराव केंद्रे यांनी ६,००,०००/- रुपयांची मागणी केली. तडजोडअंती ५,००,०००/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
सदर ५,००,०००/- रुपये रक्कमेपैकी १,५०,०००/- रुपये लागलीच स्वीकारण्याचे व उर्वरीत ३,५०,००० /- रुपये नंतर स्वीकारण्याचे मान्य करून १,५०,०००/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष सहायक नगररचनाकार मयुरेश माणिकराव केंद्रे यांनी स्वतः स्वीकारली. त्यानंतरसहायक नगररचनाकार मयुरेश माणिकराव केंद्रे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक विकास राठोड व पोलीस अंमलदार इफतेकार शेख, विष्णु बेळे, विशाल डोके, सचिन शेवाळे, अविनाश आचार्य यांनी केली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe