महाराष्ट्र
Trending

सेलू- ढेंगळी पिंपळगाव मानवात रोड दरम्यान 5 तासांचा लाईन ब्लॉक, 1 एप्रिलला काही गाड्या उशिरा धावणार !

नांदेड, दि. ३१ – लाईन ब्लॉकमुळे 1 एप्रिलला काही गाड्या उशिरा धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरी चे कार्य करण्याकरिता दिनांक 01 एप्रिल रोजी 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.

दिनांक 01 एप्रिल उशिरा धावणाऱ्या गाड्या —

1) गाडी क्रमांक 17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 135 मिनिटे उशिरा धावेल.
2) गाडी क्रमांक 17630 नांदेड ते पुणे एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरा धावेल.
3) गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस 190 मिनिटे उशिरा धावेल
4) गाडी क्रमांक 17232 नगरसोल – नरसापूर एक्स्प्रेस 90 मिनिटे उशिरा धावेल.

2 एप्रिलला उशिरा सुटणारी गाडी :
दिनांक 02 एप्रिलला धर्माबाद येथून सकाळी 04 वाजता सुटणारी 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल.

Back to top button
error: Content is protected !!