पोलिस स्टेशनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीचे सहायता कक्ष प्रभावीपणे कार्यरत करण्याचे निर्देश !
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि.१७ : ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विविध पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. हे कक्ष अधिक प्रभावीपणे कार्यरत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय विभागासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासनाकडून ज्येष्ठांसाठी एसटी प्रवासात सवलत देण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ ज्येष्ठांनी घ्यावा. ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विविध पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. हे कक्ष अधिक प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी पोलीस विभागाने सर्व स्थानकांना सूचना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत मंत्री श्री. सावंत आणि श्री.भुसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe