संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – जालना चंदनझिरा परिसरातील नविन मोंढ्यामधील बैल बाजारात सहा जण आपसात भांडण करून झुंज करत असताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून भांडण सोडवले. याप्रकरणी ६ जणांवर चंदनझिरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोहेकॉ अशोक पाडुरंग जाधव (पोलीस ठाणे चंदनझिरा जालना) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 22.08.2023 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास नविन मोंढा भागात पेट्रलिंग करीत असताना पोलिसांना फोन आला की, नविन मोंढा भागात बैल बाजार येथे भांडण सूरु असून गोंधळ चालू आहे. ही माहीती मिळताच पोहेकॉ अशोक पाडुरंग जाधव सोबत सफौ गवई, पोहेकॉ वेताळ, पोहेकाँ देशमुख चंदनझिरा नविन मोंढा येथील बैल बाजार येथे पोहोचले.
तेथे काही लोक आपसात एकमेका विरुध्द झुंज करत असतांना मिळून आले. पोलिसांनी तेथील लोकांना सारवासारव करून त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांचे नावे 1) समीर नसीर अन्सारी वय 18 वर्ष रा. लालबाग खांडसरी जालना. 2) शेख सोहेल शेख रहीम वय 25 वर्ष रा. हिंदनगर नविन मोंढा जालना. 3) अमोल केवलचंद भुरेवाल वय 24 वर्ष रा. तलैजानगर जालना 4) आकाश घनशाम भुरेवाल रा. नानक हॉस्पिटल राम मंदिराजवळ जालना असे सांगितले.
हे सर्व जण आपसात गोंधळ व झुंज करत असतांना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 160 प्रमाणे चंदनझिरा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe