Uncategorized

मित्रांनी केला कहर, दारूत दिले ज़हर ! घनसावंगीत चौघांवर गुन्हा, धूलिवंदनाला रंगाचा बेरंग !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – धूलिवंदना दिवशी दारूत विषारी द्रव दिल्याची खळबळजनक घटना घनसावंगी तालुक्यात समोर आली आहे. मित्रांनी नकळत दारूत विष टाकून ते पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत उलट्या व चक्कर आल्याने सुरुवातीला घनसावंगी नंतर जालना व त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील घाटीत दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला असून चौघां विरोधात त्याने पोलिसांत धाव घेतली आहे.

ज्ञानेश्वर देविदास पवार (वय 32वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. देवनगर तांडा, ता. घनसावंगी, जि. जालना) असे उपचाराअंती बरे झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, प्रत्येक वर्षी धूलिवंदन सनाच्या दिवशी आम्ही एकमेकावर रंग उधळुन लेंगी गाणी म्हणून उत्सहात सन साजरा करत असतो. दिनांक 07/03/2023रोजी धूलिवंदन सन साजरा करून रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर देविदास पवार हा त्याच्या देवनगर तांडा (ता. घनसावंगी) येथील घरी पत्नी व दोन्ही मुलांसह झोपला होता.

त्यावेळी शेजारी राहणारे अर्जुन उत्तम पवार, सुधाकर अर्जुन पवार, राजु अर्जुन पवार त्याच्याकडे आले व म्हणाले की, कृष्णा भीमराव पवार याचे घरी बारशाचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आमच्या सोबत लेंगी खेळण्यासाठी चल असे म्हणाल्याने ज्ञानेश्वर देविदास पवार त्यांच्या सोबत जात असताना त्यांना रस्त्यामध्ये मंच्छिद्र तुकाराम पवार भेटला. त्याचे सह लेंगी खेळण्यासाठी कृष्णा भीमराव पवार याचे घरी गेले.

त्याच्या घरासमोर 1) अर्जुन उत्तम पवार 2) सुधाकर अर्जुन पवार 3 ) राजु अर्जुन पवार 4 ) कृष्णा भीमराव पवार 5 ) मंच्छिद्र तुकाराम पवार हे सर्व लेंगी खेळत असताना कृष्णा भीमराव पवार याने ज्ञानेश्वर देविदास पवार याला नकळत ग्लासामध्ये दारू सह काहीतरी विषारी द्रव्य टाकले. ते पिण्यास दिले व अर्जुन उत्तम पवार, मंच्छिद्र तुकाराम पवार यांनी सदर दारू सह विषारी द्रव्य पिण्यासाठी आग्रह केल्याने ज्ञानेश्वर देविदास पवार ते प्यायला.

त्यानंतर दहा ते पंधरा मिनीटानंतर ज्ञानेश्वर देविदास पवार यास उलटी झाली व चक्कर आली. त्यामुळे ज्ञानेश्वर देविदास पवार हा तेथून लगेच त्याच्या घरी गेला. तेथे सुध्दा त्याला पुन्हा दोन वेळेस उलट्या झाल्या. त्याची प्रकृती खालवण्याने पत्नी, आई, वडील, भाऊ यांनी ज्ञानेश्वर देविदास पवार यास घनसावंगी सरकारी दवाखाना येथे आणले. तेथे औषध उपचार करून अधिक उपचारासाठी सरकारी दवाखाना जालना येथे व तेथून घाटी (छत्रपती संभाजीनगर) येथे औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचारानंतर त्यास डिस्चार्ज देण्यात आला.

ज्ञानेश्वर देविदास पवार याने दिलेल्या तक्रारीवरू पोलीस ठाणे घनसावंगी येथे 1) कृष्णा भीमराव पवार 2 ) अर्जुन उत्तम पवार 3) मंच्छिद्र तुकाराम पवार (सर्व रा. देवनगर तांडा, ता. घनसावंगी, जि. जालना) यांच्याविरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घनसावंगी पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!