गंगापूरछत्रपती संभाजीनगरपैठणवैजापूर

वैजापूर, गंगापूर व पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणार ! छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी 740 कोटींचा निधी !!

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

मुंबई, दि.११: छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यासाठी रस्ते, विमानतळ, तिर्थक्षेत्र विकास, संत ज्ञानेश्वर उद्यान, उर्जा निर्मिती, पाणीपुरवठा असे विविध उपक्रम आणि पायाभूत सुविधांसह सर्वांगिण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभागाचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास करण्याकरिता व धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी व स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरिता या उद्यान परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहेत. यासाठी सर्वसमावेशक आराखडा, संकल्पना तयार करण्यात येत आहे. मंत्री भुमरे अनेक दिवसांपासून जागतिक दर्जाचे उद्यान होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात भरीव प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित पैठण धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी देखील भरीव निधी तरतूद करण्यात येणार आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ व जिल्हाधिकारी कार्यालय

छत्रपती संभाजीनगर येथे पुण्यानंतर राज्यातील नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 50 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे शिवचरित्रावरील उद्यान

छत्रपती संभाजीनगर येथे शिवचरित्रावरील उद्यान विकसित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर विमानतळ भूसंपादनासाठी रक्कम रू. 740 कोटी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मराठवाड्यात सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर,जिल्ह्यातील इमारतींच्या बांधकामानां मोठ्या निधीची तरतूद

फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थान, फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह,अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे व मुलींचे शासकीय निवासी शाळा, फुलंब्री येथील निवासी शाळासाठी , कन्नड येथे न्यायालयीन इमारतीसाठी,गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय व्ही. व्ही.आय.पी. विश्रामगृह,खुलताबाद येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकरिता शासकीय निवासस्थान आदींच्या बांधकामासाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली आहे.

सांजूळ लघु प्रकल्प ता. फुलंब्री, गंधेश्वर लघु प्रकल्प ता. कन्नड, पूर्णा निवपूर मध्यम प्रकल्प ता. कन्नड, अंबाडी मध्यम प्रकल्प ता. कन्नड, अंजना पळशी मध्यम प्रकल्प ता. कन्नड विशेष दुरुस्ती अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

पैठण तालुक्यातील करण्यात येणारे ग्रामीण रस्ते

१.पैठण तालुक्यातील बोरगाव ७४ जळगाव ते खामजळगाव रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा ४३ किमी २/५०० ते ७/०

२.पैठण तालुक्यातील सोनवाडी ते दावरवाडी रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा १५७ किमी २/ ३०० ते ६/००

३. पैठण तालुक्यातील हर्षी ते दावरवाडी रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा ९२ किमी १/३०० ते ४००

४. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील आडुळ मुरादाबाद ते सांझखेडा रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा ७४ किमी २ / ५०० ते ४/००

५.पैठण तालुक्यातील म्हारोळा ते रांजणगाव खुरी रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा ७ किमी ०/०० ते ४/५००

६. पैठण तालुक्यातील शेकटा ते रांजणी रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा १७ किमी ०/०० ते ३/७५०

७. पैठण तालुक्यातील दिन्नापूर ते लोहगाव रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा २६ किमी ०/०० ते ४/००

८. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील कौडगांव ते दरकवाडी रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा १०० किमी ०/०० ते २/५००

९. पैठण तालुक्यातील पैठण रोड कॅनल ते मोहकर वस्ती रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा २६४ किमी ०/०० ते २००

१०. पैठण तालुक्यातील मुदलवाडी ते कातपूर वाहेगाव रस्त्याची सुधारणा करणे, ग्रामा १०८ किमी ०/०० ते १/५०० प्रजिमा रस्ते – अर्थसंकल्प फेब्रुवारी- २०२३

११. जिल्ह्यातील व तालुक्यातील राममा ५२ ते चित्तेपिंपळगाव पिंप्रीराजा आडगाव कवडगाव जालना रस्ता प्रजिमा ४७ किमी ०/०० ते २/५०० रस्ता डांबरीकरण व सुधारणा करणे.

पैठण तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग

१२. शेवता – बुटेवाडी-बोरगाव-धनगाव- वडाळा-ववा – बालानगर यासीनपुर-तुपेवाडी- दरेगाव १२९ सा.क्र.०/०० ते २९/०० रस्त्याची सुधारणा करणे, तालुका पैठण.

१३. पैठण तालुक्यातील पाचोड लिंबगाव -हर्षी सोनवाडी प्रजिमा ३६ पारुंडी तांडा – आदुळ – मुरादाबाद प्रजिमा १२८ किमी ०/० ते २६/०० रस्त्याची सुधारणा रुंदीकरण व पुनर्बांधणी करणे, तालुका पैठण

१४. नीलजगाव – घरदोन- खोडेगाव काद्राबाद प्रजिमा ५३ सा.क्र.०/०० ते ०/५००, १०/०० ते १०/८००, व
१२/०० ते १४/०० पूल बांधकाम व रस्त्याची सुधारणा करणे तालुका छत्रपती संभाजीनगर,
१५. देवळाई घारदोन कचनेर रस्ता प्रजिमा ३५ साक्र १०/०० ते १२०० घाट सुधारणा, व २२/०० ते २५/०० रस्त्याचे सुधारणा करणे तालुका छत्रपती संभाजीनगर

१६. कोळघर एकतुनी कडेठाण सालवडगाव रस्ता प्रस्तावित प्रजिमा १३० साक्र ०/०० ते ४८/२०० रस्त्याचे पुनर्बांधणी व सुधारणा करणे तालुका पैठण

१७. पाचोड थेरगाव नांदर आपेगाव नायगाव रस्ता प्रस्तावित प्रजिमा १३१ सा. क्र. ०/०० ते ३७/०० रस्त्याचे पुनर्बांधणी व सुधारणा करणे तालुका पैठण

१८ कोळीबोडखा नांदर आखात वाडा घारी रस्ता प्रस्तावित प्रजिमा १३२ साक्र ०/०० ते ३४/८०० रस्त्याचे पुनर्बांधणी व सुधारणा करणे तालुका पैठण.

Back to top button
error: Content is protected !!