संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- विनायक हाऊसिंग सोसायटी टिळकनगर येथे तीन मजली घराचे बांधकाम सुरु असताना घरातील बाथरुममध्ये लॉक करून ठेवलेले लाईट फिटींगचे ९६ हजारांचे वायर चोरणार्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले वायर पोलिसांनी हस्तगत केले आहे. हायकोर्टचे वकील विजयकुमार दामोदर सपकाळ यांच्या घरी ही चोरी करण्यात आली होती.
जुबेर खान फिरोज खान (वय 25 वर्षे, धंदा- मजुरी रा. इंदीरीनरगर ग.नं- 02, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. दिनांक-26/09/2023. रोजी सायंकाळी 06.00 ते दि. 27/09/2023 रोजीचे सकाळी- 09.00 वाजे दरम्यान फिर्यादी विजयकुमार दामोधर सपकाळ (वय 57 वर्ष, धंदा वकील (हायकोर्ट) छत्रपती संभाजीनगर) यांचे विनायक हाउसींग सोसायटी टिळकनगर येथे तीन मजली घराचे बांधकाम सुरु असल्याने घरातील इलेक्ट्रीक फिटींग चालु होते.
यासाठी 258793 / रुपये किमतीचे इलेक्ट्रीक वायर खरेदी केले होते. काही इलेक्ट्रीक वायरचे काम झालेले होते. त्यापैकी 96000-/ रुपये किंमतीची इलेक्ट्रीक वायर घरातील बाथरुममध्ये लॉक करून ठेवलेली होती. दरम्यान सदर बाथरुमचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने 96000 / रुपये किंमतीची इलेक्ट्रीक वायर चोरून नेल्याबाबतची तक्रार वकील विजयकुमार सपकाळ यांनी पोस्टे जवाहरनगर येथे दिली होती. त्यानुसार गुरनं-240/2023. कलम-457, 380. भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोनि केंद्रे यांनी पोउपनी वसंत शेळके, चंद्रकांत पोटे पोह मारोती गोरे पोअ यांना गुन्हा उघडकीस आणन्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या. दिनांक-29/09/2023 रोजी बिट मार्शल- 01 च्या पोलीस अमलदारांना सदर दाखल गुन्हातील आरोपी बाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हा मनपा सरकारी दवाखाना शिवाजीनगर येथे आलेला आहे. त्यावरून पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी पोउपनी वसंत शेळके, चंद्रकांत पोटे पोह मारोती गोरे पोअ तेथे जावून त्यास ताब्यात घेतले.
त्याने त्याचे नाव जुबेर खान फिरोज खान (वय 25 वर्षे, धंदा- मजुरी रा. इंदीरीनरगर ग.नं- 02, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारले असता त्याने सदर घरफोडी केल्याची कबूली दिली. त्यास न्यायालयाने 04 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) दिलेली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने सदर गुन्यातील चोरीस गेलेला इलेक्ट्रीक वायर 96000-/ रुपये किंमतीची मुद्देमाल सदर आरोपीकडून ताब्यात घेतला. सदर घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला. पुढील तपास पोउपनी वसंत शेळके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 02, शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पो. आयुक्त रंजीत पाटील, उस्मानपुरा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी वसंत शेळके, चंद्रकांत पोटे पोह, मारोती गोरे पोअ, पोअ विनोद बनकर पोअ ज्ञानेश्वर शेलार यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe