टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकाकडून 5 हजारांची लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक जाळ्यात !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – अंगणवाडी सेविकाकडून 5 हजारांची लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक जाळ्यात अडकल्या. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे ही कारवाई करण्यात आली.

1 अमृता श्रीकांत हाट्टे पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास सेवा योजना आष्टी जिल्हा बीड वर्ग 3
2 ) नीता रामदास मलदोडे कनिष्ठ सहाय्यक एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आष्टी जिल्हा बीड अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार ही अंगणवाडी सेविका असून सदरची अंगणवाडी ही मिनी अंगणवाडी होती ती महाराष्ट्र शासनाच्या 10 जानेवारी 2024 च्या जीआर प्रमाणे वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली आहे. त्यासाठी आम्ही आपले अंगणवाडीचे चांगले अहवाल पाठवलेले आहेत. त्यामुळे तुमची पगार 6000 रुपये वरून 10000 रुपये झाली आहे.

आम्हाला बक्षीस म्हणून 5000 रुपये द्या म्हणून 5000 रुपये लाच मागणी आरोपी क्रमांक एक अमृता हाट्टे व दोन नीता मलदोडे यांनी केली व आरोपी क्रमांक दोन हिने पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असून दोन्ही लोकसेवक यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – गुलाब बाचेवाड पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि .बीड, पर्यवेक्षण अधिकारी व सह सापळा अधिकारी – शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि.बीड, सापळा पथक -श्रीराम गिराम, संतोष राठोड , सुदर्शन निकाळजे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, ला. प्र. वि.बीड यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!